जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND W vs ENG W : स्मृती मंधानाच्या 2 मोठ्या चुका, टीम इंडियाला किंंमत मोजावी लागणार

IND W vs ENG W : स्मृती मंधानाच्या 2 मोठ्या चुका, टीम इंडियाला किंंमत मोजावी लागणार

IND W vs ENG W : स्मृती मंधानाच्या 2 मोठ्या चुका, टीम इंडियाला किंंमत मोजावी लागणार

भारत विरुद्ध इंग्लंड ( (India Women vs England Women) यांच्यातील टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) केलेल्या चुकीची किंमत टीम इंडियाला मोजावी लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिस्टल, 18 जून : भारत विरुद्ध इंग्लंड ( (India Women vs England Women) यांच्यात ब्रिस्टलमध्ये सुरु असलेल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. इंग्लंडनं पहिली इनिंग 9 आऊट 396 रनवर घोषित केली.  या धावसंख्येचा पाठलाग करताना शफाली वर्मा (Shefali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या जोडीनं टीमला दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 167 रनची पार्टरनरशिप केली. हा एक भारतीय रेकॉर्ड आहे. मात्र त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी स्मृतीनं केलेल्या चुकीची टीमला किंमत मोजावी लागणार आहे. पहिलीच टेस्ट खेळणारी शफाली वर्मा 96 रन काढून आऊट झाली. तिचे शतक 4 रननं हुकले. शफालीनं तिचा नैसर्गिक असा आक्रमक खेळ केला. अगदी शतकाच्या उंबरठ्यावरही तिनं उंचावरुन फटका मारला. शफालीचा तो प्रयत्न फसला. शफाली आऊट झाल्यानंतर स्मृतीवर टीमची जबाबदारी होती. स्मृतीनं अर्धशतक झळावलेलं असल्यानं ती सेट झाली होती. त्यावेळी तिनं काही काळ संयमानं बॅटींग करण्याची गरज होती. पण स्मृतीलाही धाडसी फटका मारण्याचा मोह आवरला नाही. ती 78 रन काढून आऊट झाली. स्मृतीला नॅट सेव्हियरनं आऊट केले. शफालीनंतर स्मृतीही झटपट आऊट झाल्यानं टीम इंडियावर दबाब वाढला. भारताची मिडल ऑर्डर या दबावात कोसळली. स्मृतीपाठोपाठ शिखा पांडे (0), कॅप्टन मिताली राज (2),  आणि पूनम राऊत (2) रन काढून आऊट झाले. दुसऱ्या दिवसाच्या अखेर हरमनप्रीत कौर (4) आणि दीप्ती शर्मा (0) रनवर नाबाद आहेत. शेफालीनंतर अवघ्या 16 रनमध्ये भारतानं चार विकेट्स गमावल्या. त्याची सुरुवात स्मृतीपासून झाली. ‘माझ्यापेक्षा तुम्ही ‘ते’ 4 रन मिस कराल’, शफाली वर्माची भावुक प्रतिक्रिया पहिल्या दिवशीही चूक अनुभवी स्मृती मंधानानं पहिल्या दिवसाच्या सुरुवातीलाच मोठी चूक केली होती. सातव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) इंग्लंडची ओपनर विनफिल्ड हिलचा सोपा कॅच सोडला. झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) बॉलिंगवर विनफिल्डच्या बॅटची कडा घेऊन बॉल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मृतीच्या हातात गेला, पण तिला हा अगदी सहज असलेला कॅच पकडता आला नाही.  स्मृतीच्या या चुकीमुळे इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये चांगली सुरुवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात