जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार

IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार

IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार

केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे आऊट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 7 महिन्यांंमध्ये 4 वेळा राहुलनं दुखापतीमुळे भारतीय टीममधून माघार घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरूद्धची टी20 मालिका (India vs South Africa T20 Series) सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला. या मालिकेसाठी टीम इंडियाचा कॅप्टन करण्यात आलेला केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर पडला. राहुलनं दुखापतीमुळे मालिकेतून आऊट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 7 महिन्यांंमध्ये 4 वेळा राहुलनं दुखापतीमुळे भारतीय टीममधून माघार घेतली आहे. राहुलच्या या दुखापतीमुळे निवड समितीचं टेन्शन वाढलं असून ते वेगळा विचार करू शकतात. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा या सतत दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुलचा समावेश झाला आहे. राहुलकडं टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जातं. रोहित शर्मा कॅप्टन झाल्यानंतर त्याची व्हाईस कॅप्टनपदी नियुक्ती करत निवड समितीनं त्याचे संकेत दिले होते. राहुल सतत दुखापतग्रस्त होत असल्यानं तो कॅप्टनपदाच्या शर्यतीमधून बाहेर होऊ शकतो. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं इनसाईड स्पोर्ट्सला सांगितलं की, ‘दुखापती या खेळाडूंच्या आयुष्याचा भाग आहे. कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत ते होऊ शकतं. पण, एख खेळाडू म्हणून दुखापतींची संख्या कमी करण्यासाठी स्वत:ची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. राहुलसारखा सिनिअर खेळाडू सतत दुखापतग्रस्त होत असेल तर ती काळजीची गोष्ट आहे. आम्ही आता एनसीएमधील फिजियोशी याबाबत चर्चा करणार आहोत.’ राहुल यापूर्वी नोव्हेंबर 2021 मधील न्यूझीलंड विरूद्धची टेस्ट सीरिज दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वेस्ट इंडिज विरूद्ध फेब्रुवारी महिन्यात झालेली टी20 सीरिज तसंच त्यानंतर श्रीलंके विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही राहुलनं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यापाठोपाठ आता भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेतूनही तो याच कारणामुळे आऊट झाला आहे. ‘मी केलं ते तू देखील करू शकतोस,’ सचिन तेंडुलकरनं पाठवलं जळगावच्या चिमुकल्या अनयला पत्र राहुलच्या या दुखापतीवर उपचार करण्यासाठी बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जावं लागेल.  इंग्लंड विरूद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या टेस्टसाठी फिट होण्याचं आव्हान त्याच्यासमोर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात