Home /News /maharashtra /

'मी केलं ते तू देखील करू शकतोस,' सचिन तेंडुलकरनं पाठवलं जळगावच्या चिमुकल्या अनयला पत्र

'मी केलं ते तू देखील करू शकतोस,' सचिन तेंडुलकरनं पाठवलं जळगावच्या चिमुकल्या अनयला पत्र

जळगावातील अनय डोहाळे या पहिलीतील मुलाला थेट सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) पत्र पाठवलं आहे.

    मुंबई, 9 जून : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता 9 वर्ष उलटली आहेत. त्यानंतरही त्याची जादू कायम आहे. आजही सचिनला भेटण्याची, त्याला किमान एकदा प्रत्यक्ष पाहण्याची, त्याच्याकडून यशाचा कानमंत्र घेण्याची अनेकांची इच्छा असते. काही सुदैवी व्यक्तींची ही इच्छा पूर्ण होते.  जळगावचा 7 वर्षांचा चिमुकला अनय डोहाळे (Anay Dohale, Jalgaon ) हा त्यापैकी एक आहे. पहिलीत शिकणाऱ्या अनयला थेट सचिन तेंडुलकरनं पत्र लिहून यशाचा कानमंत्र दिला आहे. सचिनचं पत्र का पाठवलं? सचिननं अनयला पत्र पाठवण्याचं कारण हे देखील खास आहे. प्रत्येक फॅनबद्दल सचिनला वाचणारं प्रेम यामधून स्पष्ट होते. जळगावचा डोहाळे परिवार चार महिन्यांपूर्वी मुंबई फिरायला आला होता. मुंबई दर्शनामध्ये गाईडने त्यांना सचिनचे घर बाहेरून दाखवले. सचिनचं घर पाहाताच या क्रिकेटच्या देवाला भेटण्याचा हट्ट अनयनं आई-वडिलांकडं केलं. त्यावर, 'सचिनला असं भेटता येत नाही, आपण घरी जाऊन त्याला पत्र लिहू असं सांगत त्याच्या आई-वडिलांनी वेळ मारून नेली. डोहाळे परिवार जळगावला परतला. अनय आई-वडिलांनी सांगितलेली गोष्ट विसरला नव्हता. सचिनला पत्र लिहिण्यावर तो ठाम होता. अखेर त्यानं आई-वडिलांच्या मदतीनं सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं. डोहाळे कुटुंबासाठी हा विषय इथंच संपला होता. पण, पत्र लिहिल्यानंतर चार महिन्यांनी सचिननं त्यांच्या पत्राला उत्तर पाठवलं आहे. 'एबीपी माझा' नं हे वृत्त दिलं आहे. काय आहे पत्र? 'मोठी स्वप्न पाहा, ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. यश हमखास मिळेल. मी हा अनुभव घेतला आहे. तू देखील तशी वाटचाल कर' असा कानमंत्र सचिननं अनयला दिला आहे. सचिननं स्वहस्ताक्षरात पत्र पाठवून त्याचे छायाचित्र व स्वाक्षरी पाठवावी अशी विनंती अनयनं केली होती. सचिननं अनयचा तो बालहट्ट देखील पूर्ण केला आहे. सचिननं या पत्रासोबत वर्ल्ड कप उंचावल्याचा तसंच शतक पूर्ण करत असलेला फोटो देखील पाठवला आहे. IND vs SA : ऋषभ पंतची कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, नव्या जबाबदारीबद्दल म्हणाला... सचिनचं हे पत्र आमच्यासाठी खूप अभिनास्पद आहे. त्याला भारतरत्न पुरस्कार का मिळाला हे यामधून दिसून येत, अशी प्रतिक्रिया अनयची आई अनघा डोहाळे यांनी दिली आहे. तर, सचिन उत्तर पाठवेल अशी अपेक्षा नसतानाही त्यांनं हे पत्र पाठवल्यानं खूप आनंद झाल्याची भावना अनयनं बोलून दाखवली.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Jalgaon, Sachin tendulkar

    पुढील बातम्या