मुंबई, 19 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट सीरिज (Pak vs NZ Series Abandoned) ऐन वेळी रद्द झाली. न्यूझीलंडच्या टीमनं सुरक्षेच्या कारणामुळे ही सीरिज न खेळण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या विषयावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेल्या मध्यस्थीचाही काही परिणाम झाला नाही. न्यूझीलंडनं हा दौरा रद्द केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पाकिस्ताननं या विषयावर आयसीसीकडं दाद घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडची टीम विशेष विमानानं मायदेशी परतली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेलनं (Chris Gayle) या विषयावर पाकिस्तानची बाजू घेतली आहे. ‘मी पाकिस्तानात उद्या जाणार आहे. माझ्यासोबत कोण येणार?’ असं ट्विट गेलनं केलं आहे. त्याचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरनं तिथं भेटूया असं उत्तर गेलला दिलं आहे.
ख्रिस गेलनं हे ट्विट केलं असलं तरी त्याचा इतक्यात तरी पाकिस्ताना जाण्याचा कोणताही विचार नाही. गेल सध्या आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) यूएईमध्ये असून पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा सदस्य आहे. आयपीएल स्पर्धा 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर यूएईमध्येच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. त्या स्पर्धेत गेल गतविजेत्या वेस्ट इंडिजकडून खेळणार आहे. त्यामुळे आगामी दोन महिने तरी गेल पाकिस्तानात जाणार नाही, हे स्पष्ट आहे. न्यूझीलंडनं दौरा का सोडला? रावळपिंडीच्या मैदानातील धक्कादायक VIDEO VIRAL आणखी एक टीम देणार नकार! न्यूझीलंडच्या टीमने घेतलेल्या या निर्णयानंतर आता आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत आहे. इंग्लंडची टीमही पाकिस्तानमधल्या (England tour of Pakistan) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतचं वक्तव्य केलं आहे. ‘न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणा ज्या पाकिस्तानमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत आहोत. लवकरच आम्ही पाकिस्तानला जायचं का नाही, याबाबतचा निर्णय घेऊ,’ असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. SIX की OUT? मैदानात पहिल्यांदाच घडली अशी घटना, अंपायरही गोंधळले 13 आणि 14 ऑक्टोबरला इंग्लंडची टीम पाकिस्तानमध्ये दोन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर दोन्ही टीम वर्ल्ड कपसाठी युएईला रवाना होणार आहेत.