• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • SIX की OUT? मैदानात पहिल्यांदाच घडली अशी घटना, अंपायरही गोंधळले

SIX की OUT? मैदानात पहिल्यांदाच घडली अशी घटना, अंपायरही गोंधळले

क्रिकेटच्या मैदानातील एखादी छोटी चूक देक्रिखील टीम आणि खेळाडू दोघांवर भारी पडते. केंट विरुद्ध समरसेट (Kent vs Somerset) यांच्यातील विटलिटी ब्लास्ट (Vitality Blast) फायनलमध्ये देखील हेच घडले.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : केटच्या मैदानातील एखादी छोटी चूक देक्रिखील टीम आणि खेळाडू दोघांवर भारी पडते. केंट विरुद्ध समरसेट (Kent vs Somerset) यांच्यातील विटलिटी ब्लास्ट  (Vitality Blast) फायनलमध्ये देखील हेच घडले. ज्यावेळी फिल्डरनं अत्यंत चपळतेनं बाऊंड्री लाईनवर कॅच पकडला. पण तो कॅच वैध आहे की नाही? हे कुणालाही समजत नव्हते. मैदानावरचे अंपायर देखील गोंधळले. त्यांना यावरील निर्णय देताना थर्ड अंपायर आणि इतकंच नाही तर मॅच रेफ्रीची देखील मदत घ्यावी लागली. विटिलिटी ब्लास्ट फायनलमध्ये केंटनं समरसेटच्या समोर जिंकण्यासाठी 20 ओव्हरमध्ये 168 रनचं टार्गेट ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना समरसेटनं 10 ओव्हरमध्ये 3 आऊट 71 रन केले होते. त्यावेळी ही घटना घडली. केंटकडून 11 वी ओव्हर टाकण्यासाठी जो डेनली आला. त्याच्या ओव्हरचा दुसरा बॉल विल स्मिडनं (Will Smeed) डीप मिडविकेटला टोलावला. त्यावेळी बाऊंड्री लाईन जवळ फिल्डिंग करत असलेल्या जॉर्डन कॉक्स (Jorden Cox) यानं कोणतीही चूक न करता जबरदस्त कॅच पकडला. पण त्यानंतर असं काही घडलं का खेळाचं सर्व चित्र बदलून गेलं. युवराज सिंह बनला 'सिक्सर किंग', ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये लगावले होते 6,6,6,6,6,6 पाहा VIDEO या व्हिडिओमध्ये दिसलं की, कॉक्सनं कॅच तर पकडला होता. पण तो त्यावेळी शरीराला पूर्ण नियंत्रणात ठेवू शकला नाही. त्यावेळी तो त्याचा सहकारी डॅनियलला धडकला. दोघांमध्ये संपर्क झाला त्यावेळी डॅनियलचा पाय बाऊंड्री लाईनला लागला होता. त्यामुळे अंपायरनं बॅट्समनला आऊट न देता सिक्स जाहीर केला. IPL 2021 : मुंबईच्या टीममध्ये नव्या फास्ट बॉलरची एण्ट्री, प्रत्येक 19व्या बॉलला घेतो विकेट! नियम काय सांगतो? आयसीसीच्या 33.3 नियमानुसार कॅच घेण्याचं काम हे तो बॉल फिल्डरच्या पहिल्यांदा संपर्कात आल्यापासून सुरु होते. त्यावेळी फिल्डरनं कॅच घेण्याबरोरच त्याच्या शरीरावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. या प्रकरणात कॉक्सला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे अंपायरनं बॅट्समनला आऊट दिलं नाही. या प्रकराच्या घटना क्रिकेटच्या मैदानावर अगदीच क्वचित घडतात.
  Published by:News18 Desk
  First published: