• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Breaking News: पाकिस्तानात खेळण्यास न्यूझीलंडचा नकार, टॉसच्या काही वेळ आधी घेतला मोठा निर्णय

Breaking News: पाकिस्तानात खेळण्यास न्यूझीलंडचा नकार, टॉसच्या काही वेळ आधी घेतला मोठा निर्णय

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मर्यादीत ओव्हर्सची सीरिज ऐनवेळी स्थगित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानात सीरिज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मर्यादीत ओव्हर्सची सीरिज ऐनवेळी स्थगित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानात सीरिज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Pakistan vs New Zealand 2021: New Zealand Calls Off Tour following a security alert ) पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही (PCB) या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. पीसीबीनं या विषयावर ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारनं पाहुण्या टीमच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त केला होता, असा दावाही त्यांनी केला आहे. न्यूझीलंडची टीम तब्बल 18 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली होती. 17 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या काळात न्यूझीलंड टीम 3 वन-डे आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका पाकिस्तानात खेळणार होती.  दोन्ही टीममधील पहिली मॅच वन-डे सुरु होण्याच्या काही तास आधी न्यूझीलंडनं हा निर्णय घेतला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: