मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

चीनमधूनही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 108 लोकांवर या लसीची चाचणी केली गेली. या चाचणीविषयी सध्या सगळीकडे चर्चा आहे.

    नवी दिल्ली, 23 मे : जगभर पसरलेल्या कोरोनाच्या हाहाकारामुळे सगळेच देश या रोगावर लस बनवण्यात लागले आहेत. यामध्ये चीननेदेखील लस बनवली आहे. कोरोना विषाणूवर अनेक ठिकाणी लस बनवण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. चीनमधूनही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 108 लोकांवर या लसीची चाचणी केली गेली. या चाचणीविषयी सध्या सगळीकडे चर्चा आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या लसीचा वापर विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी होत आहे. चिनी लसीच्या चाचणी संदर्भात वैद्यकीय जर्नल द लान्सेटमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी अनेक लॅबमध्ये लसचा अभ्यास केला आहे. कॅनसिनो कंपनीने चीनची Ad5 लस तयार केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठानं तयार केलेली कोरोना लस आणि अमेरिकन कंपनी मॉडर्ना या लसच्या अधिक ही लस समजली जात आहे. या वर्षाच्या सुरूवातीला या चिनी लसीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या होत्या असंही सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यातून सुरू झाली विमानसेवा, असा असेल प्रवासाचा मार्ग खरंतर, चीनी लसीचे काही दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. जसं की वेदना आणि ताप. पण एका महिन्यानंतर याचा त्रास जाणवला नाही. या लसीमुळे कोणताही गंभीर धोका निर्माण झाला नाही. त्यामुळे मानवांवरील लस यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. पण त्यातून कोरोनाचा नाश न होता रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याची मदत होत असल्याचं समोर आलं. अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही लस दिल्याच्या 28 दिवसांनंतर व्यक्तीच्या शरीरात इम्यून रेस्पॉन्स सगळ्यात जास्त असतो. यावेळी, जगातील विविध देशांमधील वैद्यकीय शास्त्रज्ञांची सुमारे 100 टीम लस शोधण्यात व्यस्त आहेत. त्यातील हा एका लसीचा रिपोर्ट आहे. कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण फायझर, बायोटेक आणि कॅनसिनो या कंपन्यांनी कोरोना लसीच्या मानवी चाचण्या सुरू केली आहेत. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागानं गुरुवारी सांगितलं की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस तयार करण्यासाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीला 1.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पैसे देणार आहे. सोमवारी अमेरिकन कंपनी मॉडर्नाने कोरोना लसीच्या पहिल्या फेरीच्या चाचणीविषयी माहिती दिली. पहिल्या फेरीत केवळ आठ जणांना लस देण्यात आली. ही लस सुरक्षित असल्याचं समोर आलं. तर ही लस रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे उत्पादन करते असं कंपनीनं म्हटलं होतं. बुधवारी बोस्टनमधील संशोधकांनी सांगितलं की, लस प्रोटोटाइपमुळे माकडांना कोरोना संसर्ग होण्यापासून वाचवण्यात आलं. 3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या