कोरोनाचा लसीचा 108 रुग्णांवर प्रयोग झाला यशस्वी, वाचा काय आले रिपोर्ट

कोरोनाचा लसीचा 108 रुग्णांवर प्रयोग झाला यशस्वी, वाचा काय आले रिपोर्ट

चीनमध्ये विकसित झालेल्या पहिल्या कोव्हिड-19 लसच्या पहिल्या चाचणीचा चांगला परिणाम समोर आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : जगातील सगळेच देश कोरोना विषाणूविरूद्ध लस तयार करण्यात गुंतले आहेत. यात, चीनमध्ये विकसित झालेल्या पहिल्या कोव्हिड-19 लसच्या पहिल्या चाचणीचा चांगला परिणाम समोर आला आहे. क्लिनिकल चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात पोचलेली ही लस मानवांसाठी सुरक्षित, उपयोगी आणि कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास सक्षम असल्याचं आढळलं आहे.

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीचा पहिल्या टप्प्यातील प्रयोग चीनमध्ये यशस्वी झाला आहे. वैद्यकीय चाचणी करून मानवांवर या लसीचा प्रयोग करण्यात आल्यावर ती विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याचं दिसून आलं. लसीमुळे मानवाला कोणताही अपाय होत नसल्याचंदेखील स्पष्ट झालं आहे. 'द लॉसंट' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये हा दावा केला गेला आहे. त्यानुसार, 108 प्रौढांवर केलेल्या चाचणीत, लस 'सार्स सीओव्ही -2' काढून टाकण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं आणि टी पेशींना मदत करणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रियाही विकसित करतं.

कोरोना पॉझिटिव्ह मातेसोबत होतं बाळ, तरी रिपोर्ट आले निगेटिव्ह

चीनमधील बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही लस एसएआरएस सीओव्ही -2 संक्रमणापासून संरक्षण करते की नाही याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. या अभ्यासात असं म्हटलं आहे की, 108 निरोगी प्रौढांवर केलेल्या चाचणीत 28 दिवसानंतर या लसीनं चांगले निकाल दिले. येत्या सहा महिन्यांत अंतिम निकालांवर अभ्यास केला जाईल. तर हे चांगले निकाल आमच्या यश जगाला दाखवणार, असं अभ्यासाचं सह-लेखक वेई चेन यांनी सांगितलं.

Eid Mubarak: सोशल डिस्टंसिंग पाळून आज देशभरात साजरी होतेय ईद-उल-फित्र

या लसीचा अभ्यास करताना असं समोर आलं की, एडनोव्हायरस टाईप 5 वेक्टर कोव्हिड-19 चा एकच डोस 14 दिवसांत विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज आणि टी पेशी तयार करतो. चाचणीत वापरली जाणारी एडी 5 वेक्टर कोव्हिड-19 ही लस मानवांमध्ये चाचणी केलेली पहिली लस आहे.

सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने केली कोरोनावर मात

संपादन - रेणुका धायबर

First published: May 25, 2020, 9:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading