नवी दिल्ली, 25 मे : रविवारी, रमजान उल मुबारक महिन्याचा 30 वा रोजा रोजेदारांनी पूर्ण केला. त्याचबरोबर ईदचा (Eid) चंद्रही दिसला. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी म्हणाले की, ईदचा चंद्र दिसला आहे आणि ईद-उल-फितर (Eid-Ul-Fitr)25 मे रोजी देशभरात साजरा केली जात आहे. केरळ (Kerala) आणि जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) इथे शनिवारी ईद साजरी करण्यात आली.
इस्लामिक कॅलेंडरच्या शव्वाल महिन्याची सुरुवात ईद-उल-फितरपासून होते. इस्लामिक कॅलेंडरचा हा दहावा महिना आहे. ईदचा दिवस हा एकमेव असा दिवस असतो ज्यादिवशी उपवास पाळला जात नाही. ईदच्या महिन्यानंतर म्हणजे ईश्वर शव्वाल महिना सुरू होता आणि ईद साजरी केली जाते, म्हणून तिच्या तारखा जगभरात वेगवेगळ्या असतात.
सौदी अरेबिया, युएईसह सर्व आखाती देशांमध्ये ईदचा चंद्र 23 मे रोजी दिसला, त्यानंतर ईद 24 मे रोजी साजरी करण्यात आली. भारतात 24 मे रोजी ईदचा चंद्र दिसल्यानंतर संपूर्ण देशात ईदचा सण आज साजरा होत आहे.
यावेळी संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. यामुळे, सर्व धार्मिक स्थानंदेखील बंद केली गेली आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांच्या घरातच नमाज अदा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व धार्मिक नेत्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोकांना त्यांच्या घरी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. यासह, लोकांना ईदच्या या निमित्ताने आलिंगन देऊ नका आणि सामाजिक अंतरांचे नियम पाळून अभिनंदन करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मशिदींमध्ये फक्त 5 लोक ईदची नमाज पठतील
महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने यापूर्वी आणखी कठोर बंदोबस्त ठेवला आहे. ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाचे लोक जमातबरोबर नमाज पठवणार नाहीत, असं महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. मशिदी आणि ईदगाहमध्ये केवळ 5 लोक नमाज अदा करतील असंही त्यांनी सांगितलं.
मलिक म्हणाले की, शब-ए-बारात आणि शब-ए-कदराच्या निमित्ताने ज्याप्रमाणे मुस्लिम समाजातील लोकांनी स्वत: वर संयम ठेवला आहे, त्याचप्रमाणे त्यांना ईदच्या दिवशीही घरी राहावं लागेल. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, घरीच राहून नमाज अदा करा.
का म्हणतात मीठी ईद?
ईद-उल-फितरला मीठी ईददेखील म्हटलं जातं. कारण, रोजानंतर ईद-उल-फितरला पहिल्यांदाच गोड पदार्थ खाऊन रोजा सोडतात. तसंच, मिठाई, आणि शीर खुर्मा सगळ्यांना वाटून खातात.