नवी दिल्ली, 25 मे : देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. वृद्ध आणि नवजात बालकांना कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे. मात्र सध्या एक वेगळंच चित्र दिसत आहे. दोन कोरोनाबाधित महिलांनी 14 दिवसांआधी नवजात बालकाला जन्म दिला. मुख्य म्हणजे दोन्ही बालकांची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली आणि रिपोर्ट निगेटिव्ह आले. ही दोन्हीही नवजात बालकं आपल्या आईसोबतच आहेत. या दोन्ही बालकांचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. दरम्यान डॉक्टरांनी, असे शक्य असल्याचे सांगितले आहे. कारण बालकांना स्तनपान केल्यानंतर त्यांना वेगळी सत्व मिळतात. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही महिलांची बालकं कोव्हिड-19 वॉर्डमध्ये होती. एकाला ताप होता, त्यामुळं त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सध्या दोन्ही बालकांची प्रकृती चांगली असून, त्यांच्या माता कोव्हिड-19 वॉर्डमध्ये आहेत. दोन्ही महिलांचे पहिले रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली आहे. वाचा- सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने केली कोरोनावर मात दोन्ही महिला झारखंडच्या आहेत. 11 मे रोजी या दोघांनी एचएमसीएच रुग्णालयात सिझेरियन ऑपरेशनद्वारे मुलाला जन्म दिला. महिलांचे नमुने 10 मे रोजी कोव्हिड-19 चाचणीसाठी पाठवण्यात आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात दोन्ही महिलांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील सर्व रूग्णांचे आणि 44 आरोग्य कर्मचार्यांनचे स्वाब सॅंपल घेण्यात आले. मात्र सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. वाचा- आता कोरोना व्हायरसची नाही तर ‘या’ गोष्टींची वाटतेय लोकांना भीती, धक्कादायक अहवाल वाचा- पुण्यातील तरुणाला एक चूक पडली महागात, केवळ 30 मिनिटात झाला मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







