जाहिरात
मराठी बातम्या / देश / सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने 5 दिवसांत केली कोरोनावर मात

सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने 5 दिवसांत केली कोरोनावर मात

सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने 5 दिवसांत केली कोरोनावर मात

देशातील सर्वात लहान कोरोना-बाधित रूग्णाला लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 मे : देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. रोज वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण यादरम्यान एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात छोट्या कोरोना पीडित रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या देशातील सर्वात लहान कोरोना-बाधित रूग्णाला लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. पाच दिवसांच्या या निरागस बाळ हे देशातील सर्वात तरुण कोरोना रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे. खरंतर, 13 मे रोजी रुग्णालयात कोरोना झालेल्या गर्भवती महिलेने एका मुलाला जन्म दिला. 18 मे रोजी मुलाला कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि डॉक्टरांनी पाच दिवसांनी बाळा पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. बाळाची योग्य वेळी काळजी घेतल्यामुळे तो बरा झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. Eid Mubarak: सोशल डिस्टंसिंग पाळून आज देशभरात साजरी होतेय ईद-उल-फित्र 14 दिवसांनंतर पुन्हा चाचणी डॉक्टरांनी सांगितलं की, 5 दिवसांनंतर कोरोनाची कोणतीही लक्षणं न दिसल्यामुळे बाळाला कुटूंबासह घरी सोडण्यात आलं. तिथे मुलास सावधगिरीनं स्तनपान देण्यास सांगितलं आहे. रुग्णालयाची टीम दिवसातून दोनदा कॉल करते आणि मुलाची काळजी घेते. त्यानंतर 14 दिवसांनंतर पुन्हा तपासणी करणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लहान मुलांमध्ये धोका कमी डॉ. राहुल चौधरी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या संशोधनांनुसार लहान मुलांना प्रौढांपेक्षा कोरोनाची शक्यता कमी असते. एका संशोधनानुसार, मुलांच्या नाकातील उपकला ऊतींमध्ये कोव्हिड-19 रिसेप्टर एसीई 2 चे प्रमाण खूप कमी आहे. अमेरिकेच्या माउंट सिनाई इथल्या आयकाहन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना असं आढळलं आहे की, सार्स-सीओव्ही -2 कोणत्याही सजीव शरीरात प्रवेश करण्यासाठी रिसेप्टर एसीई 2 वापरतं. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग फारसा जाणवत नाही. पण तरीदेखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा ‘गे’ म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला होता करण, सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात