Home /News /news /

मोठी बातमी, लॉकडाउन किती वाढणार? उद्धव ठाकरे मांडणार मोदींकडे 'हा' प्रस्ताव

मोठी बातमी, लॉकडाउन किती वाढणार? उद्धव ठाकरे मांडणार मोदींकडे 'हा' प्रस्ताव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंबई महानगर प्रदेशातील लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.

    मुंबई, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. परंतु, आता लॉकडाउनची उठवण्याची तारीख जवळ आली आहे. अशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींशी लॉकडाउनबद्दल चर्चा करणार आहे. मुंबई आणि परिसरातील सर्व महानगरपालिकांमध्ये लॉकडाउन वाढवण्यात यावा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. हेही वाचा - निवृत्तीनंतरही देशसेवा संपली नाही,जवानाने दान केले पेन्शन आणि बचतीचे 15 लाख 11 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात व्हिडिओ कॉन्फरसद्वारे महत्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंबई महानगर प्रदेशातील लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णं आढळत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय योजना म्हणून लॉकडाउन वाढवण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे पंतप्रधानांकडे करणार आहेत. हेही वाचा -'हम पाच', पुण्यात एकाच घरातील 5 जणांनी केली कोरोनावर मात पुढील 15 दिवस लॉकडाउन वाढवण्याची यावेळी मागणी होणार आहे. या मागणीत मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे सेवा देखील बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आसाममध्येही 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राज्यातही लॉकडाउन वाढवणे गरजेचं असल्याचं मत राज्य सरकारकडून व्यक्त होतं आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या