नवी दिल्ली, 25 मे : देशात कोरोना विषाणूचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सहा हजारांहून अधिक प्रकरणं नोंदविली जात आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 138845 वर पोहोचली आहे. यापैकी 4021 लोक मरण पावले आहेत. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात 6,977 नवीन प्रकरणं समोर आली आहे तर 24 तासांत 154 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 41.57 टक्के इतका आहे. आतापर्यंत दिल्लीत संसर्गामुळे 13,418 लोक आजारी पडले आहेत, त्यापैकी 261 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगाविषयी सांगायचं झालं तर, कोरोना विषाणूमुळे 54,58,479 लोक प्रभावित झाले आहेत. त्यापैकी 3,45,157 मरण पावले आहेत. त्याचवेळी, जगातील पहिल्या 10 देशांमध्ये भारत आला आहे, जिथे कोरोना विषाणूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनाचा लसीचा 108 रुग्णांवर प्रयोग झाला यशस्वी, वाचा काय आले रिपोर्ट देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाख 40 हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 138845 रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त मृत्यूची संख्या 4021 वर पोहोचली आहे. त्याचवेळी, कोरोनामधून बरे होणार्या लोकांची संख्या 57 हजारांच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत 57 हजार 721 लोक बरे झाले आहेत. देशात 77 हजार 103 सक्रिय प्रकरणं आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 3 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पलीकडे आहे आणि 1635 लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर तामिळनाडूमधील कोरोना रूग्णांची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे. तिथे एकूण रुग्णांची संख्या 16 हजार 277 आहे आणि 111 लोक मरण पावले आहेत. गुजरातमध्ये कोरोना रूग्णांची एकूण संख्या 14 हजारांच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत येथे 858 लोक मरण पावले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह मातेसोबत होतं बाळ, तरी रिपोर्ट आले निगेटिव्ह राजस्थानमधील एकूण रुग्णांची संख्या 7 हजारांच्या पलीकडे आहे आणि तिथे 163 लोक मरण पावले आहेत. मध्य प्रदेशात रूग्णांची संख्या 6665 आहे आणि 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील एकूण रुग्णांची संख्या 6268 वर पोहोचली असून त्यामध्ये 161 लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील रुग्णांची संख्या वाढून 3667 झाली आहे, त्यामध्ये 272 लोक मरण पावले आहेत, तर पंजाबमधील रुग्णांची संख्या 2060 आहे, ज्यामध्ये 40 लोकांचा बळी गेला आहे. सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने केली कोरोनावर मात संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.