जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येनं वाढवली चिंता, WHO ने 7 राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येनं वाढवली चिंता, WHO ने 7 राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येनं वाढवली चिंता, WHO ने 7 राज्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 1,25,101 झाली आहे. शुक्रवारी कोव्हिड-19 मुळे (Covid-19)137 लोकांचा मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 मे : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus)धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांच्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शुक्रवारी देशात प्रथमच कोरोनाची 6654 नवीन प्रकरणं उघडकीस आली. नवीन कोरोना प्रकरणं येताच, देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 1,25,101 झाली आहे. शुक्रवारी कोव्हिड-19 मुळे (Covid-19)137 लोकांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना विषाणूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारताच्या सात राज्यांत लॉकडाऊनला(Lockdown) सूट न देण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, चंदीगड, तामिळनाडू आणि बिहार इथे बंदी कायम ठेवण्याची गरज आहे. कारण गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. ज्या राज्यात कोरोना संक्रमित 5 टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत, तेथे लॉकडाउन काटेकोरपणे सुरू ठेवावं, असा सल्ला WHOकडून देण्यात आला आहे. पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की, अमेरिकेतील 50 टक्के राज्यांमध्ये लॉकडाऊनच काढलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे भारतातील 34 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश 21 टक्के या वर्गवारीत येतात. गेल्या 7 मे च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 18%, गुजरातमध्ये 9%, दिल्लीत 7%, तेलंगणामध्ये 7%, चंडीगडमध्ये 6%, तामिळनाडूमध्ये 5% आणि बिहारमध्ये 5% कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही सर्व राज्ये डब्ल्यूएचओ अंदाजापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यातून सुरू झाली विमानसेवा, असा असेल प्रवासाचा मार्ग खरंतर, डब्ल्यूएचओचा सल्ला संपूर्ण राज्यात लागू होत नाही. कारण, राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राज्यांच्या हॉटस्पॉट भागात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. लॉकडाऊनमध्ये आराम मिळाला असला तरी डब्ल्यूएचओने असे संकेत दिले आहेत की, जेथे संक्रमण अधिक पसरतं आहेत तिथे फक्त लॉकडाऊननेचे ते कमी करता येईल. कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात