नवी दिल्ली, 24 मार्च : आज जगभरात असा कोणताही घटक नाही आहे, ज्यावर कोरोना व्हायरसचा परिणाम होत नाही आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे कच्च्या तेलाच्या किंमती सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहेत. मात्र याचा फायदा ग्राहकांना होणार नाही आहे. कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किंमती लक्षात घेता पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवून सरकारी खजिन्यात वाढ करण्याचा सरकारचा मानस आहे.
(हे वाचा- कोरोनामुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार, बेरोजगारी वाढण्याची दाट शक्यता)
दरम्यान कायद्यामध्ये बदल करत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 8 रुपयांनी वाढ करण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
18 रुपयांपर्यंत असू शकतं उत्पादन शुल्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये आर्थिक विधेयक 2020 मध्ये काही बदल प्रस्तावित केले आहेत. ज्यामध्ये येणाऱ्या काळात इंधनावर उत्पादन शुल्क अर्थात एक्साइज ड्यूटी वाढवण्याचा प्रस्ताव देखील होता.
(हे वाचा-कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली, नुकसानग्रस्तांठी SBI ची खास ऑफर)
संसदेत हे विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे. यामुळे सरकार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लीटर 10 रुपयांवरून 18 रुपये तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 4 रुपयांवरून 12 रुपये प्रति लीटर करण्याची शक्यता आहे.
14 मार्चला सुद्धा झाली होती वाढ
सरकारने याआधी काही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या वाढीमुळे सरकारला 39,000 कोटी वार्षिक महसूल मिळू शकतो. या वाढीमध्ये 2 रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि 1 रुपये इन्फ्रास्ट्रक्चर सेसचा समावेश होत
(हे वाचा-आयकर विभागाकडून नवीन अलर्ट! 31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक न करणं पडेल महागात)