नवी दिल्ली, 22 मार्च : कोरोना व्हायरस देशभरात वेगाने पसरू लागल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचं, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान या कालवधीमध्ये झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी प्रत्येकजण मदतीचा हात पुढे करत आहे. देशाची सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया देखील देशाची आर्थिक स्थिती वाचवण्यासाठी पुढे सरसावत आहे. (हे वाचा- मास्क-सॅनिटायझरच्या खरेदीसाठी ही सरकारी कंपनी देणार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये ) स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोनामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना अतिरिक्त फंडिंग देण्याबाबत प्लान तयार केला आहे. COVID-19 इमरजन्सी क्रेडिट लाइन प्लान (CECL) असं या योजनेचं नाव असून ही योजना 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेअंतर्गत कॅपिटल लिमिटच्या 10 टक्क्यांपर्यंत फंड लोन मिळणार आणि जास्तीत जास्त 200 कोटी रुपयांपर्यंत हे कर्ज मिळेल. CECL अंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी 7.25 टक्के व्याजदर असणार आहे. या कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग शूल्क अर्थात प्रीपेमेंट पेनल्टी आकारण्यात येणार नाही. एसबीआयप्रमाणेच इतर सरकारी आणि खाजगी बँका देखील व्यापाऱ्यांच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे झालेलं नुकसान या योजनेमुळे भरून काढण्यास मदत होईल. CECL एका डिमांड लोनच्या स्वरूपात असणार आहे, ज्याचा कालावधी 12 महिन्यांचा असेल. कर्ज काढल्यानंतर 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे कर्ज फेडावं लागेल. (हे वाचा- कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी बाजारात नवीन नोटा? जाणून घ्या काय आहे SBI चा सल्ला ) या योजनेचा लाभ स्टँडर्ड खातं असणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्या व्यापाऱ्याचे 30 दिवसांचे आणि 16 मार्चपर्यंत ओव्हरड्यूज नाहीत, त्यांना याचा फायदा होणार आहे. ज्या कर्जदारांनी याआधी छोट्या व्यवहारांसाठी विशेष कर्जांचा फायदा घेतला आहे, ते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.