Home /News /news /

नाशिकमध्ये पोलिस प्रशासन हादरलं, वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण

नाशिकमध्ये पोलिस प्रशासन हादरलं, वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 15 झाली आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नाशिक, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये कोरोनाची महामारी पसरत आहे. त्यात नाशिकमध्ये पोलिस प्रशासन हादरलं आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. पोलिस अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळी कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 15 झाली आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हेही वाचा..सावधान! सोशल मीडियावरील गैरप्रकारांवर बारीक लक्ष, राज्यात 161 गुन्हे दाखल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यात आतापर्यंत 1011 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. 193 नागरिक 14 दिवस त्यांच्याच घरात निरीक्षणाखाली आहेत. विशेष कोरोना कक्षात 106 रुग्ण अंडर ऑब्झर्व्हेशन आहेत. 610 नागरिकांचा 14 दिवस निरीक्षण कालावधी आटोपला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 83 अहवाल अद्याप बाकी आहे. तर कोरोना कक्षातील 279 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या कोरोना कक्षात 102 संशयीत रुग्ण दाखल आहेत. दरम्यान, मालेगाव येथे कोरोनामुळं एकाचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, मालेगावमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. मालेगाव शहरात कोरोनाचे 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 35 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातील सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांसह 27 नर्सचा देखील समावेश आहे, अशी माहिती सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले यांनी दिली आहे. हेही वाचा..कोरोना संशयित गर्भवतीचा 70 किमी प्रवास, मृत्यूनंतर महिला आयोगाकडून चौकशीची मागणी राज्यात 1574 एकूण रुग्ण तर 110 मृत्यू विभागिय आकडेवारी... सगळ्यात जास्त बाधित मुंबई-1008 पुणे मंडळ- 254 कोल्हापूर मंडळ- 37 अकोला मंडळ- 34 नागपूर मंडळ- 26 संपादन-संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या