Home /News /national /

कोरोना संशयित गर्भवतीचा उपचारासाठी 70 किमी प्रवास, मृत्यूनंतर महिला आयोगाकडून चौकशीची मागणी

कोरोना संशयित गर्भवतीचा उपचारासाठी 70 किमी प्रवास, मृत्यूनंतर महिला आयोगाकडून चौकशीची मागणी

कोरोना झाल्याचा संशय होता आणि पोटातल्या बाळासह तिचा मृत्यू झाला. यापेक्षा वाईट आहे ते तिला रुग्णालयात पोहोचण्यासाठी 70 किमी प्रवास करावा लागला.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : राष्ट्रीय महिला आयोगानं नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकऱणी चौकशीची मागणी केली आहे. मृत्यू झालेली माहिला कोरोना संशयित होती आणि तिला उपचारासाठी 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागला होता. 27 वर्षे वयाच्या गर्भवती महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. याबात मिळालेली माहिती अशी की, नालासोपारा इथल्या एका महिलेला श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा तिला वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आलं. नालासोपारा ते मुंबई दरम्यान तिला 70 किमी प्रवास करावा लागला. त्यानंतर पुढच्याच दिवशी दुपारी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या गर्भातलं बाळही वाचवता आलं नाही. ही घटना दुर्दैवी असून महिला आयोगानं चौकशीची मागणी केली आहे. महिला आयोगानं ट्विट केलं की, महाराष्ट्रात नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला दुर्दैवी परिस्थितीतून जावं लागलं. तिला कोरोना झाल्याचा संशय होता आणि तिचा उपचारावेळीच मृत्यू झाला. यापेक्षा वाईट आहे ते तिला रुग्णालयात पोहोचण्यासाठी आणि उपचारासाठी 70 किमी प्रवास करावा लागला. हे वाचा : 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी मुंबईत आज (10 एप्रिल) कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड ब्रेक आकडा समोर आला आहे. मुंबईत एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता हजाराच्या घरात पोहोचली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या 1008 झाली असून मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. हे वाचा : लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये लगीनघाई, Matrimonial Website झाली क्रॅश संपादन - सुरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या