मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोरोनाची दहशत असताना कोकणात अज्ञात आजाराचं थैमान, गुहागरमध्ये 19 जणांचा मृत्यू

कोरोनाची दहशत असताना कोकणात अज्ञात आजाराचं थैमान, गुहागरमध्ये 19 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोकणात अज्ञात आजारानं डोकं वर काढलं आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोकणात अज्ञात आजारानं डोकं वर काढलं आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोकणात अज्ञात आजारानं डोकं वर काढलं आहे.

गुहागर, 28 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोकणात अज्ञात आजारानं डोकं वर काढलं आहे. गेल्या 15 दिवसां गुहागरमधील पडवे येथे 10 तर काळसूर कौंढर येथे 9 अशा 19 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. दोन्ही गावातील लोक सध्या वेगळ्याच दहशतीखाली वावरत आहेत.

पडवे गावातल्या मुस्लिम वस्तीत मागच्या 15 दिवसांत एक दोन नव्हे तर तब्बल 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. या 10 लोकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचं नेमकं वैद्यकीय कारण समोर न आल्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... ट्रॉलीमध्ये माल लोड करताना तिसऱ्या मजल्यावरून कोसळला हेल्पर, समोर आला VIDEO

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र आरोग्य कसून काम करताना दिसत आहे. मात्र, गुहागरमधील पडवे गावात काम करत असताना आरोग्य विभागाला आजपर्यंत एकही रुग्ण सर्दी, ताप वा खोकला असलेला आढळून आला नाही. तरी देखील पडवे या एकट्या गावात गेल्या 15 दिवसांत अचानक 10 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभागात देखील खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यू झालेले 90 टक्के लोकं ही वयोवृद्ध असल्याची माहिती आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, यातील सर्वांचे मृत्यू हे नैसर्गिक झाले आहे. मात्र, कोविडच्या काळात इतक्या कमी दिवसांत जास्त लोकांचे मृत्यू झाल्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली असल्याचं मेडिकल ऑफिसर डॉ. घनश्याम जागींड यांनी म्हटलं आहे.

पडवे या खाडीच्या लगत असलेल्या मुस्लिम वस्तीत सुमारे 4 हजार एवढी लोकसंख्या असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच याभागात आरोग्य सेवक चौकशीसाठी जात आहेत. मात्र इतक्या मोठ्या वस्तीत आजवर सर्दी, ताप, खोकला किंवा अन्य आजाराची लक्षणे असलेला एकही रुग्ण सापडलेला नाही, असं आरोग्य विभाग सांगत आहे. तपासणीसाठी गेलेल्या लोकांना स्थानिकांकडून भीतीपोटी नीट माहीती दिली जात नसल्याचे देखील आरोग्य विभाग आणि गावचे सरपंच मानसी सुर्वे यांनी देखील सांगितलं आहे. त्यामुळे लोकांनी स्वतः हा समोर येऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावं, असं आवाहन सरपंच मानसी सुर्वे यांनी केलं आहे.

हेही वाचा...Corona Warriors : कोरोनाला हरवून आता कोरोना रुग्णांना पुरवतोय 'ऑक्सिजन'

दुसरीकडे, गुहागरमधील काळसुर कौंढर गावात देखील 9 जणांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र मृतांच्या संपर्कात आलेल्या या गावच्या 7 जणांचे swab तपासणीला पाठवल्यानंतर ते निगेटिव्ह आल्यामुळे कौंढरच्या ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे पडवे गावातल्या ग्रामस्थांनी देखील स्वतः हून आरोग्य तपासणी करून घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हादरलेले तालुका प्रशासन करत आहे.

First published:
top videos