डोंबिवली, 28 जुलै: लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करताना तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळून एक कामकाराचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली (पूर्व) एमआयडीसी फेस 2 मधील नवजीवन डाईंग कंपनीत ही घटना घडली आहे. ही घटना कंपनीत बसवलेल्या CCTV कॅमेरात कैद झाली आहे.
हेही वाचा...शब्दांचा धार चढवा... कोणी चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा, BJP कार्यकर्त्यांना आदेश
मिळालेली माहिती अशी की, ओमकार गुप्ता असं मृत कामगाराचं नाव आहे. ओमकार हा नवजीवन डाईंग कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. काल (27 जुलै) ओमकार हा तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट ट्रॉलीमध्ये माल लोड करीत होता. यावेळी त्याचा तोल जावून तो खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
ट्रॉलीमध्ये माल लोड करताना तिसऱ्या मजल्यावरून कोसळला हेल्पर... pic.twitter.com/1jCwXmEQd0
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2020
तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या ओमकारला उपचारार्थ नजीकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात त्याचा भाऊ लवकुश याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही कंपन्यानी त्यांची कार्यालये भाड्याने दिली आहेत तर काहींनी ती विकली आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे.
हेही वाचा...
गेल्या काही दिवसांमध्ये फूड डिलिव्हरी कंपनी, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्या आणि मध्यम स्तरावर असणाऱ्या स्टार्टअप्सने त्यांची कार्यालये बंद केली आहेत किंवा भाड्याने दिली आहेत. कंपनीचे अधिकारी आणि इस्टेट डेव्हलपर्सच्या मते कंपन्या त्यांचे भाडे सरासरी एक तृतीयांश कमी व्हावे, अशी मागणी करत आहे.