Corona Warriors : कोरोनाला हरवून आता कोरोना रुग्णांना पुरवतोय 'ऑक्सिजन'

Corona Warriors : कोरोनाला हरवून आता कोरोना रुग्णांना पुरवतोय 'ऑक्सिजन'

कोरोनामुक्त व्यक्ती आता कोरोना रुग्णांसाठी 'ऑक्सिजन' बनला आहे.

  • Share this:

ब्रिजम पांडे/पटना, 28 जुलै : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) गंभीर रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची (oxygen) गरज पडते. मात्र अनेकदा ते उपलब्ध होत नाही आणि परिणामी रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. अशाच ऑक्सिजनची गरज भासली होती ती पटनातील गौरव कुमार यांना. त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळालं नसतं तर त्यांचं काय झालं असतं, याची कल्पनाही त्यांना करवत नाही आणि याच ऑक्सिजनचं महत्त्व समजून ते आता इतर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवत आहेत.

गौरव कुमार यांना कोरोनाचं निदान झाला. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांची पत्नी अरुणाने त्यांना पटनातील पीएमसीएच रुग्णालयात दाखल केलं. गौरव यांची प्रकृती खूपच गंभीर होत होती. त्यांना ऑक्सिजनची गरज होती. त्यांच्या पत्नीने ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केल. मुश्किलीने त्यांना ऑक्सिजन सिलेंडर मिळाला आणि वेळेत ऑक्सिजन मिळाल्याने गौरव कुमार यांचा जीव वाचला.

गौरव कुमार यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. मात्र कोरोनाशी लढताना ज्या परिस्थितीचा सामना त्यांना आणि त्यांच्या पत्नीला करावा लागला, ते विसरले नाही. आपल्यावर जी वेळ आली ती इतर कोरोना रुग्णांवर येऊ नये म्हणून या दाम्पत्याने ऑक्सिजन सिलेंडरची बँकच सुरू केली.

हे वाचा - हसता-बोलता कोरोना रुग्णांचा मृत्यू; लक्षणं न दिसणाऱ्यांमध्ये हॅप्पी हायापोक्झिया

गौरव यांनी आपली पत्नी आणि काही मित्रांच्या मदतीने ही मोहीम सुरू केली आहे.  या बँकेत ऑक्सिजन सिलेंडर जमा केले जातात आणि ज्यांना गरज आहे त्यांना दिले जातात. गौरव यांना ऑक्सिजन सिलेंडरसाठी फोन येताच ते आपल्या गाडीने ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवतात. ऑक्सिजन सिलेंडरसाठी जी काही उपकरणं लागतात तेदेखील गौरवरच पुरवतात. सध्या त्यांच्याकडे 30 ऑक्सिजन सिलेंडर आहेत.

गौरव यांनी ऑक्सिजन लावण्याचं प्रशिक्षणही घेतलं आहे. ते स्वत: रुग्णांना ऑक्सिजन देतात. गरजूंना ऑक्सिजन देऊन आज ते कित्येक कोरोना रुग्णांचा आधार किंबहुना ऑक्सिजनच बनले आहेत असं म्हणण्यास हरकत नाही. फक्त ऑक्सिजनच नाही तर आता गौरव कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्माही दान करणार आहेत. याआधीही त्यांनी  86 वेळा रक्तदानही केलं आहे आणि आता कोरोना रुग्णांनाही आपलं रक्त देणार आहेत.

Published by: Priya Lad
First published: July 28, 2020, 4:38 PM IST

ताज्या बातम्या