ग्रीन झोनच्या उंबरठ्यावर असलेल्या जालन्याला धक्का, CRPFच्या 4 जवानांसह 5 जणांना कोरोना

ग्रीन झोनच्या उंबरठ्यावर असलेल्या जालन्याला धक्का, CRPFच्या 4 जवानांसह 5 जणांना कोरोना

सातोना परिसरातील एक व्यक्ती रुग्णवाहिकेद्वारे मुंबईहुन परतला होता, त्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

  • Share this:

जालना, 02 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती त्यामुळे जालना जिल्हा ग्रीन झोनच्या उंबरठ्यावर उभा होता. पण, आता पुन्हा एकदा 5 संशयित रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव दलातील जालना येथील तुकडीतील जवान असून एक रुग्ण हा मुंबई येथून परतूर तालुक्यात परतला होता, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. जालना येथे आतापर्यंत एकूण 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 2 रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत तर भोकरदन तालुक्यातील पारध येथील 17 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणीवर जालना येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर पोलिसांनाच झाली कोरोनाची लागण

जालना जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच अचानक जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा वासियानमध्ये खळबळ उडाली आहे. जालना येथील राज्य राखीव दलातील 4 जवान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बंदोबस्त करून परतले होते. तर परतूर तालुक्यातील सातोना परिसरातील एक व्यक्ती रुग्णवाहिकेद्वारे मुंबईहुन परतला होता, त्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा - पालघर साधू हत्यांकाडातील आरोपींबद्दल आली धक्कादायक बातमी समोर, प्रशासन हादरले

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यातील जनतेला आगामी कालावधीत अधिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 2, 2020, 11:52 AM IST

ताज्या बातम्या