मुंबई, 2 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री बाहेरील कलानगर मुख्य गेटवरील तीन पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या तीनही पोलिसांवर सध्या पुढील उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. मात्र खबरदारी म्हणून कला नगर परिसरातील सर्व पोलिसांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या आधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सर्व पोलिसांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. मुंबईत शुक्रवारी 751 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 7625 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी 5 मृत्यूंसह 295 मृत्यूसंख्या झाली आहे. मृतांमध्ये 3 पुरुष 2 महिलांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 2 हजार अतिरीक्त खाटांची उपलब्धता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 2 हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बीड) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांत आधी सर्वेक्षण करून त्यांना आवश्यकत भासल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार होईल, अशी नवी कार्यपद्धती ठरविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यात अपयश आल्यामुळे संपूर्ण जग लॉकडाउनमध्ये अडकले आहे. अद्याप या विषाणूला रोखण्यासाठी लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले नसले तरी, आता काही देशांनी मे महिन्यापासून लॉकडाउनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीजिंगच्या फॉरबिडन शहरापासून टेक्सासपर्यंत अनेक देशांमधील मॉलही आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे. याचे मुख्य कारण सर्वच देशांसमोर निर्माण झालेला आर्थिक प्रश्न हेच आहे. काही देशांमधील परिस्थिती सर्वसामान्य होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही अनिश्चितता कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.