नवी दिल्ली, 13 एप्रिल : कोविशील्ड लस (Covishield Vaccine) तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदार पूनावाला यांनी दावा केला आहे की, मेड इन इंडिया (Made in India) कोविड-19 लसीनं अमेरिकन फायझर आणि मॉडर्ना सारख्या mRNA लसींच्या तुलनेत कोरोना संसर्गापासून अधिक सुरक्षा दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ म्हणाले की, "भारतात बनवलेली कोरोना लस कोविड महामारीपासून फायझर आणि मॉडर्नासारख्या mRNA लसींपेक्षा अधिक संरक्षण देत आहे."
ते म्हणाले, "फायझर आणि मॉडर्नासारख्या लसी भारतात आल्या नाहीत, हे चांगलं आहे. कारण अमेरिकेसारख्या देशात लोकांनी दुसरा आणि तिसरा बूस्टर डोसही घेतला आहे. तरीही अनेक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. पण भारतात आमच्या लसी आहेत. त्यांनी चांगली सुरक्षा प्रदान केली आहे.
हे वाचा - 'नवरा कारल्याचा ज्युस पित नाही', बायकोची थेट पोलिसात तक्रार; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
10 एप्रिलपासून, सर्व प्रौढांना लसीचा बूस्टर डोस मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) यांनी त्यांच्या लसींच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक कमी केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.