Home /News /national /

'नवरा कारल्याचा ज्युस पित नाही', बायकोची थेट पोलिसात तक्रार; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

'नवरा कारल्याचा ज्युस पित नाही', बायकोची थेट पोलिसात तक्रार; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

कारल्यावरून नवरा-बायकोतील वाद पोहोचला तो थेट पोलीस ठाण्यात.

    आग्रा, 11 एप्रिल : नवरा-बायकोतील भांडणं काही नवीन नाहीत (Husband wife fight news). बऱ्याच दाम्पत्यामध्ये छोट्या छोट्या कारणावरून किरकोळ वाद होतच असतात. अगदी जेवण किंवा खाणंही याला अपवाद नाही. अशाच खाण्यावरून नवरा-बायकोतील वाद पोहोचला तो थेट पोलीस ठाण्यात. आपला नवरा कारल्याचा ज्युस पित नाही, अशी तक्रार घेऊन बायको पोलिसांकडे गेली (Husband not drink bitter gourd juice wife reached police station). आग्रातील हे प्रकरण आहे. कुटुंब सल्लागार केंद्रावर हे कपल गेलं. तिथं त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. पत्नीच्या तक्रारीनुसार तिच्या पतीला डायबेटिज आहे. ती त्याला कारल्याचा ज्युस बनवून देते पण तो पित नाही. पण तो कारल्याचा आणि दुधीचा ज्युस पित नाही. त्याच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून तो दररोज भांडतो. तब्बल दोन महिने या कपलतं काऊन्सिंग सुरू होतं. अखेर पतीने आपली चूक मान्य केली. आपण आता भांडण न करता कारल्याचा ज्युस पिऊ असं त्याने पोलिसांसमोर बायकोला आश्वासन दिलं. त्यानंतर दोघंही एकत्र घरी गेले. हे वाचा - बायकोने अपमानाचा घेतला असा खतरनाक बदला; दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाही घाबरू लागला नवरा दरम्यान खाण्यावरून नवरा-बायकोचा वाद पोलिसात पोहोचण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी महाराष्ट्रातही असं एक प्रकरण समोर आलं होतं.  बुलडाण्याच्या साखरखेडा गावातील पती-पत्नीमध्ये तीन अंड्यांवरून भांडणं झाली. दोघंही एकमेकांविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले. पतीनं पोलिसांना सांगितलं, त्यानं बाजारातून कोंबडीची तीन अंडी आणली आणि बायकोला त्याची बुर्जी बनवायला सांगितली. नवरा बुर्जी खायला आला तेव्हा त्याला बुर्जी काही मिळाली नाही. यावर पत्नीनं सांगितलं, आपण तिन्ही अंड्यांची बुर्जी बनवली. पण ती आपल्या मुलीला खायला दिली आणि मग काय यावरूनच नवरा-बायकोत जुंपली. हे वाचा - VIDEO: लग्नाच्या स्टेजवर नवरदेव भलत्याच कामात झाला मग्न; भडकलेल्या नवरीने मंडपातच घडवली अद्दल पोलिसांनीही अनोख्या पद्धतीनं हा वाद सोडवला. त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याला बाजारात पाठवलं आणि त्याला तीन अंडी आणायला सांगितलं. ही अंडी त्यांनी नवरा-बायकोच्या हातात ठेवली. मग काय दोघंही खूश. हातात अंडी घेऊन आनंदी चेहऱ्यानं दोघंही आपल्या घरी गेले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Wife and husband

    पुढील बातम्या