डोंबिवली, 10 जुलै : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कडकडीत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. परंतु, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचं आढळून आलं. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. या रुग्णाला कुठून आला याबद्दल विचारण्याचा प्रयत्नही केला. पण, त्याची बोलण्याचीही स्थिती नव्हती. विकास दुबेचा खेळ खल्लास, ज्या ठिकाणी एन्काउंटर केलं तिथला पहिला VIDEO अखेर तीन तासानंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याबद्दल केडीएमसीचे अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला होता. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. हा रुग्ण कुठे पळून गेला याची माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर स्थानिकांनी हा व्हिडिओ केल्यानंतर या रुग्णाचा पत्ता लागला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याआधीही शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळून जाण्याचे प्रकार घडले होते. कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालय ही खचाखच भरलेली आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे हाल होत आहे. धक्कादायक! पुण्यात Whatsapp स्टेटस ठेवून इंजिनियर तरुणानं संपवलं आयुष्य कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या 24 तासात 580 नवे रुग्ण आढळून आले आहे. 5219 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 5548 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 164 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.