सांगली, 11 जून: कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. सलून दुकान बंद असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईला कंटाळून एका व्यक्तीनं त्यांच्या 4 वर्षांच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. हेही वाचा… औरंगाबादमधील बहीण-भाऊ दुहेरी हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात मिळालेली माहिती अशी की, इरळी येथील रहिवासी नवनाथ साळुंखे यांचा सलूनचा व्यवसाय आहे, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असलेने नवनाथ आर्थिक अडचणीत सापडला आहे. जगावं तरी कसं? कुटुंबाचं पोट भरावं कसं असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला आहे. याच नैराश्यातून नवनाथ यानं पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वत:ही आत्महातेचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने ही बाबत इतरांच्या लक्षात आल्यानं त्यांना तातडीनं सांगली सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं. बाप-लेकावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगली जिल्हा सलून संघटनेचे अध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली आहे. हेही वाचा… महिलेकडून जबरदस्तीनं वसूल केला कर्जाचा हफ्ता, कंपनीला शिवसैनिकांनी शिकवला धडा राज्यात लॉकडाऊन 4 नंतर सलून दुकाने सोडून सर्व व्यावसायिकांना व्यवसायाची परवानगी देण्यातआली. सलून दुकाने बंद असलेने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सलून दुकानदारानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शासनाने सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत देऊन दुकाने चालू करणेची परवानगी दयावी, अशी मागणी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







