औरंगाबाद, 11 जून: औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात मंगळवारी बहीण आणि भावाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आता धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. चुलत भाऊ आणि मेव्हणा मारेकरी निघाले आहेत. सोनं चोरण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा...पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत
एमआयटीसमोरील एका बंगल्यात किरण खंदाडे (18) आणि सौरभ खंदाडे या बहीण भावाची गळा चिरुन निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार पथक तैनात केली आहे. या प्रकरणी मृतकांच्या चुलतभावासह त्याच्या मेव्हण्याला अटक केली आहे. सतिश काळुराम खंदाडे (वय-20, रा. पाचनवडगांव), अर्जुन देवचंद राजपुत (वय-24, रा.रोटेगांव रोड वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
औरंगाबाद शहर पोलिसांनी 36 तासांत बहीण-भावाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. हे हत्याकांड जवळच्या नातेवाईकांनीच केलं असावं असा संशय पोलिसांना आधीपासून होता. आणि हा संशय खरा ठराला. किरण आणि सौरभ या बहीण-भावाची हत्या त्यांचा चुलत भाऊ आणि मेव्हण्यान केल्याचं स्पष्ट झालं.
9 जून रोजी सातारा परिसरातील रहिवासी सौरभ खंदडे आणि किरण खंदडे या दोघांची गळे चिरून हत्या करण्यात आली होती. घरातील एक किलो सोने चोरीला गेले, अशी तक्रार मृतांच्या आई-वडिलांनी केली होती. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशन वरून आरोपी सतीश खंदडे मृतांचा सख्खा चुलत भाऊ तर अर्जुन राजपूत हा मेव्हणा आहे, अशी माहिती, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली आहे.
हेही वाचा..प्रेमात अडथळा बनला मामा, प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं असा काढला काटा
सोनं चोरण्याच्या उद्देशानेच हत्या...
औरंगाबादमध्ये बहीण-भावाच्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं हादरुन गेलं होतं. औरंगाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रँचला हत्याकांडाचा छडा लावण्यात यश आलं आहे. सोनं चोरण्याच्या उद्देशानेच चुलत भावानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने या दोन बहीण भावांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. बहीण-भावाची हत्या करुन घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार मारेकऱ्यांनी चोरले होते.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.