Home /News /maharashtra /

महिलेकडून जबरदस्तीनं वसूल केला कर्जाचा हफ्ता, कंपनीला शिवसैनिकांनी शिकवला धडा

महिलेकडून जबरदस्तीनं वसूल केला कर्जाचा हफ्ता, कंपनीला शिवसैनिकांनी शिकवला धडा

महिलेने आपल्या मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने तिने आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते.

सोलापूर, 10 जून: कर्जाचा हफ्ता वसूल करणाऱ्या एका खासगी फायनान्स कंपनीचं कार्यालयावर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. बार्शी शहरात मंगळवारी ही घटना घडली. रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह हॉटेल परिसरात असलेल्या फायनान्स कार्यालयाची मोडतोड केली. लॉकडाऊन च्या काळात जबरदस्तीने कर्जाचे हफ्ते वसूल करणाऱ्या बार्शी येथील फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले आहे. हेही वाचा... कोरोना हॉटस्पॉटमध्ये मटण पार्टीवरून महापालिका आणि पोलिस आयुक्तांमध्ये जुंपली लॉकडाउनच्या काळात लोकांकडे रोजचं आयुष्य जगण्यासाठी पैसे नाहीत. मात्र अशातही या कंपन्या हप्त्यासाठी कर्जदारांना धमकावत होत्या. एका महिलेला धमकावत असता त्या महिलेला ह्रदयविकाराचा धक्का बसला त्याची तक्रार नातेवाईकांनी शिवसनेकडे केली. तसेच कंपन्यांचे कर्मचारी लोकांना घरी जाऊन शिविगाळ करून पैसे भरण्यासाठी धमकावत असल्याने तसेच एका महिलेचे मंगळसूत्र देखील गहाण ठेवावे लागले, या तक्रारीनंतर मंगळवारी शिवसेनेने आपल्या स्टाईलने आंदोलन केल्याचं बार्शीचे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले. एक महिलेला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी आपलं मंगळसुत्र गहाण ठेवावं लागवं. ही माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फायनान्य कंपनीच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील कर्मचार्‍यांनी या महिलांशी बेजबाबदार वर्तन होत असल्याने शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चिडून कार्यालयावर दगडफेक केली यात कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणी, बार्शी पोलिस स्टेशनमध्ये अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. हे आंदोलन येथील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर व त्यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. या दगडफेकीत वेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता पुरुष कार्यकर्ते भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. बार्शी शहरातील एक महिलेला बजाज फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्यामार्फत त्या महिलेच्या घरी जाऊन त्रास देण्याचा प्रकार घडला होता. त्याचबरोबर त्या महिलेने आपल्या मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने तिने आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते. ही माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांना कळताच त्यांनी याबाबत खाजगी फायनान्स कंपनीकडे विचारणा करण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले की, शासनाने आणि आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार नोव्हेंबर महिन्यापर्यंत कर्जवसुली थांबवावी, असे आदेश असताना काही खासगी कंपन्या फायनान्स, बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट अशा संस्थांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावण्याचे प्रयत्न होत आहेत. काही वित्तीय संस्थांनी गाव गुंडामार्फत सक्तीची वसुली चालू केली आहे. लोकांच्या गाड्या ओढून नेणे लोकांच्या घरी जाऊन अपमानास्पद वागणूक देणे, असे प्रकार चालू आहेत. असे प्रकार आता शिवसेना खपवून घेणार नाही शिवसेना स्टाईलने प्रत्येक वित्तीय संस्थेला उत्तर मिळेल, तेव्हा कर्जवसुली तत्काळ थांबवावी कारण लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाही व्यापारी अडचणीत आहेत रिक्षावाल्यांचे धंदे नाहीत, अशा काळामध्ये जर वसुली झाली तर तसे उत्तर दिले जाईल. हेही वाचा...4 वर्षाच्या मुलीसह 2 चिमुरडे अडकले अचानक लिफ्टमध्ये, सुटकेचा थरारक VIDEO बार्शी शहरात तालुक्यात काही खासगी सावकार अव्वाच्या सव्वा दराने वसुली करत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त होत आहेत. तरी जर कोणत्या सावकाराने वसुलीसाठी तगादा लावला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाऊसाहेब आंधळकर यांनी दिला.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या