मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सतत झोप येणं हा देखील आजारच, जाणून घ्या हायपरसोम्नियाविषयी!

सतत झोप येणं हा देखील आजारच, जाणून घ्या हायपरसोम्नियाविषयी!

एकूण लोकसंख्येच्या 4 टक्के ते 6 टक्के लोकसंख्येला हा आजार असतो. सतत झोप येणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नसतं.

एकूण लोकसंख्येच्या 4 टक्के ते 6 टक्के लोकसंख्येला हा आजार असतो. सतत झोप येणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नसतं.

एकूण लोकसंख्येच्या 4 टक्के ते 6 टक्के लोकसंख्येला हा आजार असतो. सतत झोप येणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नसतं.

नवी दिल्ली, 14 जुलै : झोप पूर्ण न झाल्याची तक्रार काही जण नेहमी करतात. कधी कामामुळे किंवा ताण असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र काही व्यक्तींना रात्री पुरेशी झोप घेऊनही दिवसा पुन्हा झोपावं (Feeling Sleepy) वाटतं. इतकंच नाही, तर दिवसा झोप घेऊनही आपली झोप झालीच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. अशा व्यक्तींना सतत झोप येते. मग कामात लक्ष न लागणं, बाहेर आणि घरातही अडचणी अशा गोष्टी सुरू होतात. याला हायपरसोम्निया (Hypersomnia) म्हणतात. खरं तर हा आजार आहे. एकूण लोकसंख्येच्या 4 टक्के ते 6 टक्के लोकसंख्येला हा आजार असतो. सतत झोप येणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नसतं. या हायपरसोम्नियाची लक्षणं (Symptoms) काय असतात, त्यासाठी काय काळजी घ्यायची, याबाबत डीएनएनं वृत्त दिलं आहे. हायपरसोम्निया हा आजार असून यात रुग्णाला रात्री पुरेशी झोप घेऊनही दिवसा जागं राहणं कठीण होतं. यामुळे कामात नीट लक्ष लागत नाही. अलर्ट राहू शकत नाही. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. एकूण लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांना हा आजार असतो. कुमारवयात किंवा 17 ते 24 या वयोगटाच्या तरुणांमध्ये प्रामुख्यानं हा आजार झालेला दिसून येतो. या आजारासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं अधिक चांगलं असतं. समुपदेशकांशी चर्चा करूनही त्यावर उपाय शोधता येतो किंवा काही सपोर्ट ग्रुपची मदत घेऊन हायपरसोम्नियावर मात करणं शक्य होऊ शकतं. हायपरसोम्नियाची लक्षणं हायपरसोम्निया हा आजार असला, तरी तो पट्कन ओळखणं अवघड आहे, कारण त्याची लक्षणं इतर लोकांमध्येही आपल्याला दिसतात. म्हणूनच त्याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. - दिवसा प्रचंड झोप येण्याचे प्रसंग वारंवार घडणं. - सकाळी किंवा दुपारची झोप झाल्यावर उठायला जड जाणं, उठल्यानंतर गोंधळाची अवस्था असणं किंवा चिडचिड होणं - राग येणं, त्रास वाटणं - अस्वस्थं वाटणं - विचरक्षमता मंदावणं, बोलताना मंदपणा जाणवणं - एकाग्रतेचा अभाव (Concentration) किंवा लक्ष केंद्रित करु न शकणं - लक्षात न राहणं, डोकेदुखी - भूक मंदावणं (Loss Of Apetite) - भास होणं हायपरसोम्नियाला कसं सामोरं जावं? या आजाराचा सामना (To Cope With Hypersomnia) करताना स्वतःला काही नियम घालून घेणं गरजेचं आहे. कारण झोपेवर ताबा मिळवणं इतरांपेक्षा स्वतःलाच जमणं गरजेचं असतं. त्यासाठी रोज रात्री ठराविक वेळेलाच झोपावं. झोपण्याच्या कालावधीत कॅफेन असलेले पदार्थ खाणं किंवा पिणं टाळा. यात कॉफी, कोला, चहा, चॉकलेट तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाणारी औषधं यांचा समावेश आहे. झोपण्याआधी अल्कोहोल घेऊ नका. तसंच झोपण्यापूर्वी तंबाखू किंवा निकोटिन असलेल्या गोष्टींचं सेवन करू नका. आहार किंवा औषधोपचार यासंबंधी तुमच्या झोपेबाबतच्या तज्ज्ञांचं मत विचारा. या आजाराचा सामना करत असलेल्यांनी एखादं धोकादायक उपकरण वापरताना किंवा गाडी चालवताना खूप काळजी घेतली पाहिजे. झोप घेणं ही चांगली गोष्ट असते. मात्र वारंवार झोपणं आणि झोप न झाल्याची भावना सतत राहणं ही गोष्ट आरोग्यासाठी चांगली नाही. हा आजार झालेल्या लोकांना आळशी किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी अपात्र समाजण्याची चूक समाजाकडून होते. त्याऐवजी त्या आजाराविषयी माहिती घेऊन त्याबाबतचं अज्ञान दूर करणं हा योग्य पर्याय ठरतो.
First published:

Tags: Sleep, Sleep benefits

पुढील बातम्या