मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : महाविकास आघाडीत वाद पेटला, काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप

BREAKING : महाविकास आघाडीत वाद पेटला, काँग्रेस मंत्र्याचा अजित पवारांवर थेट आरोप

'नबाव मलिक यांच्या माहितीसाठी अनेक दलित अधिकारी संघटनांनी अध्यादेश रद्द करावा म्हणून अर्ज काँग्रेस पक्षाकडे केले म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतली'

'नबाव मलिक यांच्या माहितीसाठी अनेक दलित अधिकारी संघटनांनी अध्यादेश रद्द करावा म्हणून अर्ज काँग्रेस पक्षाकडे केले म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतली'

'नबाव मलिक यांच्या माहितीसाठी अनेक दलित अधिकारी संघटनांनी अध्यादेश रद्द करावा म्हणून अर्ज काँग्रेस पक्षाकडे केले म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतली'

मुंबई, 27 मे : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीमध्ये (MVA Goverment) बिघाडीचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काँग्रेसचे (Congress) नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. 'उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतले नाही' असा थेट आरोपाच राऊत यांनी केला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीआधीच महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना नितीन राऊत यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 'आजच्या कॅबिनेट बैठकीत पदोन्नती आरक्षण जीआरबाबत आग्रही भूमिका मांडणार आहोत. हा जीआर रद्द करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे', असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

चला, मुंबईत आज पेट्रोलसाठी मोजा 'ही' कोरी करकरीत नोट

'कॉमन मिनिमम ठरलेला आहे. आरक्षण विषयावर भूमिका काय घ्यायची हा पक्षपातळीवर विषय आहे. आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र पाठवले पण महाविकास आघाडी समन्वय समिती बैठक घेतली नाही', असंही राऊत यांनी सांगितले.

'अजित पवार यांनी फक्त एकच बैठक घेतली पण विश्वासात घेतले नाही. नबाव मलिक यांच्या माहितीसाठी अनेक दलित अधिकारी संघटना यांनी अध्यादेश रद्द करावा म्हणून अर्ज काँग्रेस पक्षाकडे केले म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतली, अध्यादेश रद्द करावा ही ठाम भूमिका आहे', असंही राऊत म्हणाले.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होईल का? विजय वडेट्टीवार म्हणाले...

राज्यात मराठा आरक्षण रद्द झाले आणि त्यानंतर पदोन्नती आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने महाविकास आघाडीत प्रत्येक हक्काचा मतदारांना जपण्याचं काम केले जात आहे. पदोन्नती आरक्षण देण्याच्या संदर्भात मंत्र्यांची समितीमध्ये अजित पवार प्रमुख असल्याने त्यावरुन देखील मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे काही नेते पदोन्नती आरक्षण अध्यादेश रद्द करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे देखील चर्चा आहे. यामुळेच महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.

First published:
top videos