मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी

मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी

'मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे'

'मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे'

'मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे'

मुंबई, 27 मे: मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावर खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यांना न्याय द्यावा, आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. ठरल्याप्रमाणे आज संभाजीराजे यांनी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.

'दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

...अन् मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला अखेर दिलासा, केलेली 'ती' विनंती मान्य

मराठा समाजावर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर रस्तावर येत मोर्चा, आंदोलन करण्याची भाषा काही मराठा संघटना करत आहेत.  त्याचवेळी न्यायालय लढाई सरकार पातळीवर लढली जाणार आहे. या सर्व गोष्टींवर पवार आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली.

तरुणीवर गँगरेप, युवतीनेही दिली साथ; VIRAL VIDEOनंतर मंंत्र्यांची अशी प्रतिक्रिया

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे.

राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे या भेटींकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

First published:
top videos