मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले ?

मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले ?

पावसाळी अधिवेशनात थेट मुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधकांनी धुरळा उडवून दिला.

  • Share this:

नागपूर, 06 जुलै : "असा कोणताही घोटाळा झाली नाही, माझा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांनीच राजीनामा द्यावा" अशी थेट मागणीच करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सिडको जमीन प्रकरणी संपूर्ण जमीन खरेदी प्रक्रियेला स्थगिती दिलीये अशी माहिती सूत्रांनी दिलीये. सतराशे कोटींचा सिडकोचा जमीन खरेदी विक्रीत घोटाळाला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

काँग्रेसने राज्य सरकारवर नवी मुंबईत 17 कोटींचा भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. भाजपच्या नेत्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या कथीत 24 एकर भुखंड घोटाळा प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय. हा भूखंड सरकारचाच असून यात कोणताही घोटाळा झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

काय आहे काँग्रेसचा सरकारवर 1767 कोटींचा आरोप ?, ठळक मुद्दे

गुरुवारी अधिवेशनात सिडको घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पावसाळी अधिवेशनात थेट मुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधकांनी धुरळा उडवून दिला.

'तो' भूखंड सरकारचाच,कोणताही घोटाळा नाही -मुख्यमंत्री

विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भूखंडाची मालकी राज्य सरकारची असून जमिनीचा सिडकोशी संबंध नाही. या घोटाळ्यासाठी माझा राजीनामा मागितला जात असेल तर पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनाही राजीनामा द्यावा लागेला. आता चौकशी सुरू करुन ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे असे फडणवीस म्हणाले. पृथ्वीराज यांच्यासारख्या साध्या माणसाने कोणाच्याही सांगण्यावरुन असे आरोप करु नये असेही ते म्हणाले.

‘जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’,- मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी जमीन हस्तांतरण खरेदीला स्थगिती दिलीये. याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या 24 एकर जागेची मालकी ही सिडकोकडे असल्याचा काँग्रेसनं दावा केलाय.

एकंदरीतच कोणत्याही आरोपावरुन हात झटकणे असो अथवा कुणालाही क्लिन चीट देणाऱ्या राज्य सरकारने अखेर सिडको भूखंड खरेदी प्रक्रियेला स्थगिती देऊन सपशेल माघार घेतलीये. सिडको घोटाळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री हरले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जिंकले असं म्हणावं लागेल.

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी केली 'भन्नाट' मागणी,विरोधकही बुचकळ्यात पडले

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 04:54 PM IST

ताज्या बातम्या