काय आहे काँग्रेसचा सरकारवर 1767 कोटींचा आरोप ?, ठळक मुद्दे

काय आहे काँग्रेसचा सरकारवर 1767 कोटींचा आरोप ?, ठळक मुद्दे

हे बिल्डर भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र आहेत तसंच पार्टनरही असू शकतात असा आरोप निरुपम यांनी केलाय.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमिनीच्या खरेदी विक्रीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सरकारनं सिडकोची 24 एकर जमीन नियमबाह्य पद्धतीनं एका बिल्डरला हस्तांतरीत केल्याचा आरोपही त्यांनी केला.

सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, मुंबई शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर घणाघाती आरोप केालय. बाजार भावानुसार या जमिनीची किंमत 1600 कोटी रूपये असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांच्या सांगण्यावरून मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना ही जमीन विकासासाठी दिल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. नियमानुसार ही जमीन सिडकोनंच डेव्हलप करणे अपेक्षित होतं.

- सिडको नवी मुंबई येथील २४ एकर जमीन

- सिडको डेव्हलप करेल अशी तरतूद, संबंधित जमिन सिडको न ठेवतां कोयना धरणग्रस्तांसाठी दिली

- पॅरेडाईझ बिल्डर संबंधित जमीन नावावर करून घेतली

- मनिष भतिजा, संजय भालेराव यांनी जमीन बळकावली

- तहसीलदार मौजे ओवे येथील यांनी जमिन व्यवहार केले, सिडकोने मात्र यांवर काहीच हरकत घेतली नाही

- सरकारचा हा 1767 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा आहे

- कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 8 शेतकरी कुटुंबांना मुंबई विमानतळाजवळ खारघर इथं 24 एकर जमीन देण्यात आली होती

- या आठ शेतकऱ्यांची जमीन पॅराडाईज या कंपनीचे मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी 15 लाख प्रतिएकर कवडीमोल किंमतीने आणि दमदाटीने खरेदी केली

-1767 कोटी रुपयांची जमीन फक्त 3 कोटी 60 लाख रुपयात जबरजास्तीने खरेदी केली

- हे बिल्डर भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र आहेत तसेच पार्टनरही असू शकतात.

- 14 मे 2018 रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं आहे

- त्याच दिवशी या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी या बिल्डरांना मिळाली

- या प्रक्रियेला अनेक महिने लागत असताना त्याच दिवशी हा अधिकार कसा प्राप्त झाला?

- 23 जून 2018 रोजी मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षक घेऊन जमिनीचा ताबा घेतला.

First published: July 2, 2018, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading