बीड, 06 मार्च : बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बार्शी रोडवर एका मनोरुग्णाने चांगलाच गोंधळ घातला. भर-रस्त्यावर मोठे-मोठे दगड घेऊन तो चारही दिशेनं भिरकाऊ लागला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आज सकाळी शहरातील बार्शी रोड वरून लहान मुलं शाळेत जात होते. या शिवाय सकाळची वेळ असल्याने रहदारी होती. अशातच अचानक एका मनोरुग्णाने जोरात ओरडत गोंधळ घालायला सुरुवात केली. चक्क हातात मोठ-मोठी दगड घेऊन चारही दिशांना फेकू लागल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना दगड लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्व प्रकारामुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मनोरुग्णामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हातात मोठ-मोठे दगड घेऊन चारी दिशांना भिरकाऊ लागल्याने सकाळच्या वेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला- मुली आणि इतर नागरिकांना दगड लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच रस्त्यावरून जड वाहनांची देखील वाहतूक सुरू होती. अशावेळी एखाद्या वाहनाची 'त्या' मनोरुग्णाला धडक बसून जीवही जाऊ शकत होता.
या मनोरुग्णाचे नाव काय आहे हे समजू शकले नाही. एवढंच नाही तर या गोंधळात दरम्यान 'त्या' मनोरुग्णाने भिरकावलेला एक दगड महाविद्यालयात चाललेल्या एका मुलीला लागता-लागता राहिला. यातून ती थोडक्यात बचावली. अखेर काही वेळानंतर पोलीस आणि स्थानिकांनी या मनोरुग्णाला पकडलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.