जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड, शिवाजीनगरच्या हॉटेलमध्ये एक महिला सापडल्याने बिंग फुटलं

पुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड, शिवाजीनगरच्या हॉटेलमध्ये एक महिला सापडल्याने बिंग फुटलं

पुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड, शिवाजीनगरच्या हॉटेलमध्ये एक महिला सापडल्याने बिंग फुटलं

पोलिसांना सापडलेली सदर पिडीता उझबेकिस्तान देशाची असून तिची सुटका करण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 6 मार्च : मॉन्टी उर्फ जगन्नाथ अर्यल हा एस्कॉर्टच्या माध्यमातून पुण्यात वेश्याव्यवसाय करवून घेतो, अशी माहिती समोर आली आहे. जगन्नाथ अर्यल याने एस्कॉर्ट नंबरवर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधून एका परदेशी महिलेला शिवाजीनगरच्या जवळ असेल्या सेंच्युरियन हॉटेलमध्ये पाठवलं होतं. तिथं ही महिला सापडल्याने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना सापडलेली सदर पिडीता उझबेकिस्तान देशाची असून तिची सुटका करण्यात आली. सदर महिलेकडून मिळालेल्या माहितीवरून बिझ्झ तमन्ना हॉटेल हिंजवडी फेस 1 येथून 5 पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर 5 पीडित महिलांपैकी 1 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 1 ओडिसा आणि 1 पंजाब येथील राहणाऱ्या आहेत. सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांना तमन्ना हॉटेलमधून ताब्यात घेवून  पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर 6 पीडीत महिलांना (2 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 2 इतर राज्यातील) रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले आहे. नागपूरमध्येही झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश नागपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये सुशिक्षित तरुणींचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. स्वतःचे महागडे हौस पूर्ण करण्या साठी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींना गुन्हे शाखेने सोडवलं. हेही वाचा- अर्धनग्न होईन भररस्त्यावर मनोरुग्णाचा राडा, दगडं घेऊन लागला मागे, पाहा हा VIDEO इंदोर आणि कोलकाता मधून या तरुणींना नागपुरात शरीरविक्रीच्या व्यवसायासाठी आणण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. नागपुरातील सीए रोड परिसरातील हॉटेल ओयो टाऊनमध्ये छापेमारी करत या काळ्या बाजाराची पोल खोल गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात