भारतात या शहरात स्वस्त मिळतंय पेट्रोल, मुंबईपेक्षा प्रति लिटर 19 रुपयांनी दर कमी

भारतात या शहरात स्वस्त मिळतंय पेट्रोल, मुंबईपेक्षा प्रति लिटर 19 रुपयांनी दर कमी

देशात 7 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ सलग बाराव्या दिवशीही कायम राहिली.

  • Share this:

मुंबई, 18 जून: देशात 7 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ सलग बाराव्या दिवशीही कायम राहिली. दिल्लीत पेट्रोल 78 रुपये तर मुंबईत 84 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचले आहे. तर डिझेलची किंमत पहिल्यांदाच 76 रुपये प्रति लिटर झाली आहे. 12 दिवसांत दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 6.55 रुपये तर डिझेलच्या किमतीत 7.04 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, देशात असे एक राज्य आहे, तिथे सगळ्यात स्वस्त पेट्रोल मिळत आहे.

हेही वाचा..मोठी कारवाई, जवानांकडून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त, 4 सैनिकांचा मृत्यू

अंडमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयरमध्ये 65.70 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर देशात महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोलचे दर सगळ्यात जास्त आहे. या मागे कारणही तसे रंजक आहे.

संपूर्ण देशात पेट्रोल-डिझेलचे दर समान नाहीत. या मागे अनेक कारणे आहे. इंधनाचे दर कमी जास्त का असतात, तर राज्यातील मूल्य वर्धित कर अर्थात व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. काही राज्यात VAT कमी आकारला जातो तर काही राज्यात जास्त. त्यामुळे या परिणाम थेट इंधनाच्या दरांवर होत असतो.

देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढ ही अनेक बाबींवर अवलंबून आहे. प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी आहेत. मात्र, उत्पादन शुल्क, राज्य व्हॅट, डिलर कमीशन आणि परिवहन खर्च याचा अतिरिक्त भार यामुळे इंधनाचे दर निर्धारित केले जात असतात.

इंधर दराचं असं आहे समिकरण...

रिफायनरीद्वारा डिलरवर लावलेले मूल्य केंद्र सरकार कर (सीमा शुल्क, उत्पादन शुल्क) राज्य कर (व्हॅट) डिलर कमीशन परिवहन खर्च.

देशात या शहरात पेट्रोल सर्वात महाग...

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर देशात सगळ्यात जास्त तर पोर्ट ब्लेयरमध्ये सर्वात स्वस्त आहे. IOCची वेबसाइटवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात परभणी शहरात पेट्रोल प्रति लिटर 86.68 रुपये आहे. देशात हा दर सगळ्यात जास्त आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 84.66 रुपये आहे. कारण महाराष्ट्रात टॅक्स जास्त आहे.

हेही वाचा... तब्बल 35 वेळा अपयश पचवून IPS होणाऱ्या विजय वर्धन यांची यशोगाथा

दुसरीकडे, पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सगळ्यात कमी आहे पेट्रोल 65.70 रुपये प्रति लिटर तर डिझेल 64.45 रुपये प्रति लिटर आहे. कारण येथे टॅक्स कमी आहेत.

First published: June 18, 2020, 3:38 PM IST

ताज्या बातम्या