मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तब्बल 35 वेळा अपयश पचवून IPS होणाऱ्या विजय वर्धन यांची यशोगाथा

तब्बल 35 वेळा अपयश पचवून IPS होणाऱ्या विजय वर्धन यांची यशोगाथा

UPSC परीक्षा पास होणं तसं पाहायला गेलं तर सोपं नाही.

UPSC परीक्षा पास होणं तसं पाहायला गेलं तर सोपं नाही.

UPSC परीक्षा पास होणं तसं पाहायला गेलं तर सोपं नाही.

मुंबई, 18 जून : UPSC परीक्षा पास होणं तसं पाहायला गेलं तर सोपं नाही. त्याची कठीण पातळी आणि चिकाटीनं अभ्यास कऱण्याची वृत्ती आपल्याकडे असायला हवी. वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये तब्बल 30 वेळा अपयश आल्यानंतर त्यांनी अखेर UPSC देण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी तयारी सुरू केली आणि 36 व्या वेळी UPSCची परीक्षा देऊन IPS झाले. IPS अधिकारी विजय वर्धन यांच्या या यशाची कहाणी.

विजय वर्धन हे हरियाणाच्या सिरसा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. विजय यांचे सुरुवातीचे हरियाणामध्येच झाले. यानंतर विजय उच्च शिक्षणासाठी बाहे पडले. हिसार इथून त्यांनी 2013 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. विजय यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी केली आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते दिल्लीत गेले व तेथूनच त्यांनी UPSC परीक्षेचे कोचिंग घेतले.

हे वाचा-वयाच्या 21 वर्षीच IAS झालेल्या स्नेहल धायगुडेचा प्रेरणादायी प्रवास

UPSC परीक्षेत पास होणं हे खूप कठीण मानलं जातं. त्यामुळे सरकारी नोकरीत इतर ठिकाणी परीक्षा देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. यूपीएससी व्यतिरिक्त ए आणि बी दर्जाच्या हरियाणा पीसीएस, यूपी पीसीएस, एसएससी सीजीएल असे अनेक 30 वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करुन परीक्षा दिल्या होत्या. यापैकी एकही परीक्षेत त्यांची निवड न झाल्यानं ते निराशा झाली. पण विजय यांनी परिस्थिती स्वीकारून पुन्हा एकदा जोरदार तयारीला सुरुवात केली.

विजय यांचे मुख्य लक्ष्य यूपीएससी परीक्षेवर होते, त्याच अनुषंगाने त्यांनी 2014 पासून यूपीएससी परीक्षा देणे सुरू केले. 2014 आणि 2015 मध्ये विजय फक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुख्य परीक्षेत नापास झाले. तिसऱ्यांदा विजयने आपल्या तयारीचा मार्ग बदलला. वारंवार अपयशी ठरल्यानंतरही विजयचा हेतू डगमगला नाही आणि 2017 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी मुलाखतीत पोहोचले. वारंवार अपयशी ठरले तरी विजय यांचा दृढ निश्चय आणि त्याहीपेक्षा धैर्य वाखाणण्याजोगे होते.

हे वाचा-15 महिन्यांत तयारी करून UPSCमध्ये मिळवला दुसरा क्रमांक, 23 व्या वर्षी झाला IAS

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Career, Upsc, Upsc exam