Home /News /news /

माऊथ वॉशमुळे मरू शकतो कोरोना विषाणू? काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं

माऊथ वॉशमुळे मरू शकतो कोरोना विषाणू? काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं

शरीराच्या पेशींना संक्रमित करण्याआधी माऊथ वॉश विषाणूचा नाश करेन आणि कोव्हिड-19 पासून त्याचं संरक्षण होऊ शकतं. दरम्यान, WHO याआधी माऊथ वॉशविषयी आपली वेगळी मत मांडली होती.

    नवी दिल्ली, 16 मे : कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाचा नाश करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. अशात वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय टीमच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, माऊथ वॉशमध्ये कोरोना विषाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. अहवालात असं म्हटलं आहे की, शरीराच्या पेशींना संक्रमित करण्याआधी माऊथ वॉश विषाणूचा नाश करेन आणि कोव्हिड-19 पासून त्याचं संरक्षण होऊ शकतं. दरम्यान, WHO याआधी माऊथ वॉशविषयी आपली वेगळी मत मांडली होती. WHO ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, माऊथ वॉशमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून तुमचं रक्षण होईल असे कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाही. परंतु ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या फंक्शन मॅगझिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, माऊथ वॉशमध्ये विषाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. पण याच्या क्लिनिकल चाचण्या फार महत्वाचे आहेत. 8 लाख लोकांची केली हत्या, 25 वर्षांनी आरोपीला झाली अटक कार्डिफ युनिव्हर्सिटी, यूके इथल्या संशोधकांनी कार्यक्षेत्रात एक महत्त्वाची माहिती प्रकाशित केली आहे. कार्डिफ विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ तसंच नॉटिंघम, कोलोराडो, ओटावा, बार्सिलोना यासह इतर विद्यापीठांच्या तज्ञांनी संशोधकांच्या टीमला पाठिंबा दर्शविला होता. खरंतर, मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं माऊथ वॉश कोरोनापासून संरक्षण करू शकतं असं संशोधकांनी म्हटलं नाही. परंतु यावर पुढील संशोधन करणं फायदेशीर ठरू शकतं. एक चहाची तलफ आणि वाचलं 24 जणांचं आयुष्य, काही लोकांचा प्रवास ठरला अखेरचा वास्तविक, कोरोना विषाणू Enveloped VirusesViruses' च्या वर्गातील आहेत. याचा अर्थ असा की, कोरोना हा एका फॅटी थराने झाकलेला आहे. हा थर विशिष्ट प्रकारच्या केमिकलेच नष्ट होऊ शकतो. संशोधकांच्या अभ्यासानुसार, माऊत वॉश कोरोना विषाणूचे बाह्य आवरण काढून टाकू शकतं. एका चाचणी ट्यूबमध्ये केलेल्या प्रयोगात असं आढळलं की, माऊथ वॉशमध्ये असे घटक असतात जे Enveloped Viruses चे बाह्य आवरण काढून टाकतात. संशोधकांचं म्हणणं आहे की, दात स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या माऊथ वॉशमध्ये क्लोरहेक्साइडिन, सेटलिपिरिडिनियम क्लोराईड, हायड्रोजन पेरोक्साईड आणि पोव्हिडोन-आयोडीन ही रसायनं असतात. संशोधनानुसार या रसायनांमध्ये संसर्ग रोखण्याची क्षमता आहे. शेजाऱ्यांचा जावई दिल्लीवरून आला म्हणून खेळला खूनी खेळ, जागीच झाला दोघांचा मृत्यू
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या