8 लाख लोकांची केली हत्या, 25 वर्षांनी आरोपीला झाली अटक

8 लाख लोकांची केली हत्या, 25 वर्षांनी आरोपीला झाली अटक

25 वर्षांपूर्वी नरसंहार आणि त्यासाठी मदत केल्याचा आरोप मोस्ट वाँटेड काबुगावर होता. त्याच्यावर अमेरिकेनं 5 मिलियन डॉलरचं बक्षिसही ठेवलं होतं.

  • Share this:

किगली (रंवाडा), 16 मे : जवळपास 25 वर्षांपूर्वी रवांडामध्ये एक नरसंहार झाला होता. 1994 मध्ये देशात एक हेट कँपेन सुरू कऱण्यात आलं होतं. त्यानतंर पुढच्या 100 दिवसांमध्ये किमान 8 लाख लोकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आी होती. या नरसंहारातील आरोपी आणि जगातील मोस्ट वाँटेड असलेला उद्योजक फेलिसिन काबुगाला अखेर अटक करण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता अखेर फ्रान्समधून त्याला ताब्यात घेण्यात आलं.

एकेकाळी रवांडातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या फेलिसिनला शनिवारी पॅऱीसमधून अटक करण्यात आली. फ्रान्सच्या जस्टिस मिनिस्ट्रीने सांगितलं की, बनावट ओळखपत्राच्या आधारे तो पॅरीसमधील एका फ्लॅटमध्ये राहत होता. आफ्रिकेच्या या मोस्ट वाँटेडला संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रायब्यूनल फॉर रवांडाने 1997 मध्ये नरसंहार, त्यात मदत केल्याचे आरोप केले होते. अमेरिकेनंसुद्धा त्याच्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं.

रवांडामध्ये तुत्सी समाज अल्पसंख्यांक असूनही हुतूपेक्षा जास्त पॉवर त्यांच्याकडे होती. मात्र 1959 मध्ये इथं उलथापालथ झाली. तुत्सीचं राज्य गेलं आणि हजारो लोकांना इतर देशांमध्ये शरण जावं लागलं. 1990 मध्ये यातील काही लोकांनी विद्रोह केला आणि रवांडन पॅट्रियाटिक फ्रंट तयार करून रवांडावर हल्ला केला. शेवटी 1993 मध्ये शांती करार केला. पण त्यानंतर वर्षभरात सगळंच चित्र बदललं.

हे वाचा : एक चहाची तलफ आणि वाचलं 24 जणांचं आयुष्य, काही लोकांचा प्रवास ठरला अखेरचा

तत्कालीन राष्ट्रपती जुवेनल हबयरिमना यांच्या विमानावर 6 एप्रिल 1994 ला हल्ला झाला. त्यात विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. हुतू कट्टरपंथीयांनी या हल्ल्यामागे आरपीएफ असल्याचा आरोप केला. तर आरपीएफने हुतुंनीच विमानावर हल्ला करून लोकांची हत्या करण्यासाठी कारण शोधलं असा आरोप केला. दरम्यान विरोध करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या कुटुंबांना संपवण्यास सुरुवात झाली. लोकांचे ओळखपत्र पाहून हत्या करण्यात येत होती.

हे वाचा : धक्कादायक! गेल्या 8 दिवसांत वेगवेगळ्या अपघातात 75 मजुरांचा मृत्यू

महिलांना या ठिकाणी सेक्स स्लेव म्हणून ठेवलं जात होतं. रेडिओ स्टेशन्स, न्यूजपेपरमधून हेट कँपेन चालवलं जात होतं. पादरी, नन हेसुद्धा लोकांची हत्या करून चर्चमध्ये आसरा घ्यायचे. इतकंच काय तर पती पत्नी एकमेकांचा जीव घ्यायचे. कारण त्यांना धमकी दिली जायची तुम्ही असं केलं नाहीत तर तुम्हाला ठार करू. फक्त तुत्सी नाही तर हुतु जे वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही ठार केलं जात होतं.

हे वाचा : केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय, संरक्षण क्षेत्रात भारत देणार स्वबळावर टक्कर

First published: May 16, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या