Home /News /news /

राज्यात आजही होणार मुसळधार पाऊस, वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज

राज्यात आजही होणार मुसळधार पाऊस, वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज

पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

राज्यात आजही अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

    मुंबई, 08 ऑगस्ट : तब्बल 4 दिवस मुंबईसह अनेक उपनगरांना झोडपून काढणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून मात्र दडी मारली आहे. शुक्रवार सकाळपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईतल्या अनेक उपनगरांत हलक्या सरी वगळता पाऊस थांबला होता. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात आजही अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 8 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज राज्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडले. महाराष्ट्राच्या किनारी भागात सोसाट्याचा वारा राहिल. त्यामुळे समुद्रकिनारी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 9 ऑगस्टला वातावरण ढगाळ राहिल. तर राज्यभर हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 4 दिवसांता पावसाने मुंबईची तुंबई केली होती. राज्यभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं. अशात शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी असाच मुसळधार पाऊस मुंबईत पुन्हा 11 ऑगस्टला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी! मुंबई पाऊस केंद्रीय हवामान खात्याचे संशोधक डॉक्टर जेनामनी यांच्यानुसार आगामी 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे परिसरामध्ये आजही पाऊस होण्याची शक्यता असून उत्तर कोकणमध्ये आगामी दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी Good News मुंबईला पाणीपुरवठा करणारं विहार तलाव हे पूर्णपणे भरुन वाहू लागला आहे. मुंबईत 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री हा तलाव ओसंडून वाहत होता. यापूर्वी काही दिवस आधी म्हणजे 27 जुलै रोजी तुळशी तलावदेखील ओसंडून वाहत होता. कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 दिवसांत होणार निर्णय तुळशी तलावातूनदेखील मुंबईला पाणीपुरवठा होतो. विहार तलाव बोरिवली राष्ट्रीय उद्यानात आहे. हा तलाव भरल्यामुळे मुंबईकरांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे संकट टळलं आहे. 3 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यातील प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आता भरला आहे. यापूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलावही भरला होता. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 05 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन तलावांपैकी विहार तलाव ओसंडून वाहिला. गेल्या वर्षी 31 जुलै 2019 रोजी 27,698 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेले हे तलाव ओव्हरफ्लो झालं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Mumbai rain, Weather

    पुढील बातम्या