जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या 2 बहिणींचा घराच्या छतावर सापडला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय

आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या 2 बहिणींचा घराच्या छतावर सापडला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय

आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या 2 बहिणींचा घराच्या छतावर सापडला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय

दोन्ही बहिणी ब्रिटीश नागरिक असून आपल्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानात आल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंजाब, 20 जानेवारी : 17 आणि 24 वर्षांच्या दोन बहिणींचा बाथरूममध्ये धोकादायक गॅस गळतीमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब पाकिस्तानच्या पंजाबमधील दौलत नगरची आहे. दोन्ही बहिणी ब्रिटीश नागरिक असून आपल्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानात आल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारिया (वय 24) आणि नादिया रहमान (वय 17) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावं आहेत. बाथरूममधील गिझरमधून गॅस गळतीमुळे दोघींचा मृत्यू झाला. दोघेही घराच्या मजल्यावर मृत अवस्थेत आढळल्या. 12 जानेवारी रोजी झालेल्या मृत्यूची बातमी आता आंतरराष्ट्रीय माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवालाशी संबंधित माहितीदेखील अद्याप समोर आलेली नाही. इतर बातम्या - शिवसेनेतील दोन गटांत तुफान राडा, पदाधिकाऱ्याचे डोके फुटले त्याचबरोबर पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे की, पालकांनी मुलींच्या मृत्यूला अपघात मानले आहे आणि कायदेशीर कारवाईचा विचार केला नाही. पाकिस्तानमध्ये हजर असलेल्या मुलींचे नातेवाईक, बऱ्याच दिवसांनंतरही या घटनेबद्दल बोलण्यावर टाळाटाळ करताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा येऊ लागल्या आहेत. इतर बातम्या - अपघात शबाना आझमींचा आणि ट्रोल झाली उर्वशी रौतेला ते सुद्धा मोदींच्या ट्वीटवरून! द सनच्या वृत्तानुसार, मारिया आणि नादियामध्ये ऑनर किलिंगचा प्रकार झाला असवा असं काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु बहिणींच्या सावत्र आईने असे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की गॅस गळतीमुळे बहिणींचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. इतर बातम्या - पुन्हा निर्भया! मित्रांनीच बलात्कार करुन तरुणीला हायवेवर फेकलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात