मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) शनिवारी कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी बॉलिवूडसह फॅन्सनी प्रार्थना केली आहे. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही आहे. तिने आपल्या अकाऊंटवर ट्विट केलं आहे. उर्वशी म्हणाली, शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणार आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते’ हे ट्विट तिने इंग्रजीमधून केलं होतं. मात्र उर्वशीने केलेल्या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी तिला तुफान ट्रोल केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की हे तो Ctrl C + Ctrl V म्हणजेच कॉपी पेस्ट आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. Ctrl C + Ctrl V ही संगणकाची सांकेतिक भाषा आहे. याचा अर्थ कॉपी-पेस्ट करणं असा होतो. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ‘शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,’ असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानंतर उर्वशीने केलेलं ट्विट हे कॉपी केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. उर्वशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटमध्ये साम्य आढळल्यानं नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं. उर्वशीने पंतप्रधान (pm modi) यांचं ट्विट कॉपी करून ट्विट केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी लावला आहे.
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) January 18, 2020
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2020
Ctrl C + Ctrl V
— ADITYA KISHTAWAL (@SastaNobita) January 19, 2020
Cut copy paste
— वरुण जैन Varun jain (@jainvarun1995) January 18, 2020
🤣🤣🤣🤣@iAnkurSingh @pokershash @AsYouNotWish pic.twitter.com/CE7oDajRzQ
‘उर्वशी कॉपी कॅट, कॉपी पेस्ट करण्यापेक्षा स्वत:चं लिही की’, अशा पद्धतीच्या कमेंट्स करून आणि वेगवेगळे मीम्स तयार करून उर्वशीला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं आहे. सध्या शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. हेही वाचा- शबाना आझमींच्या अपघातानंतर लोक का करतायत या सैनिकाला सलाम? कोण आहेत शबाना आझमी? शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण आझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम हेही वाचा- विकी कौशलच्या भावाचा धक्कादायक खुलासा, विकीच्याच गर्लफ्रेंडवर होता डोळा

)







