शिवसेनेतील दोन गटांत तुफान राडा, पदाधिकाऱ्याचे डोके फुटले

शिवसेनेतील दोन गटांत तुफान राडा, पदाधिकाऱ्याचे डोके फुटले

शिवसेनेचे आमदार संजय क्षीरसाठ आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सचिन जिरे, औरंगाबाद, 20 जानेवारी : औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. या मारहाणीत शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांचे डोके फुटले. याप्रकरणी आता शिवसेनेचे आमदार संजय क्षीरसाठ आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मारहाण प्रकरणात आता या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादमधील सातारा गावातील रस्त्याच्या निविदेवरून शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर आणि आमदार संजय क्षीरसाठ समर्थकांत वाद झाला. या वादानंतर सुशील खेडकर यांना आमदार क्षीरसाठ यांच्यासह उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांचे डोके फुटले होते.

साईबाबा जन्मस्थळ वाद: तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

याप्रकरणी आता वेदांतनगर पोलीस ठाण्यात आमदार संजय क्षीरसाठ, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार क्षीरसाठ आणि राजेंद्र जंजाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

'नाईट लाईफ'वरुन गृहमंत्र्यांचा यू-टर्न, म्हणाले आदित्य ठाकरेंचा निर्णय योग्यच

दरम्यान, शिवसेनेतीलच दोन गटांतमध्ये हा राडा झाल्यामुळे औरंबादमध्ये पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्वाकडूनही वाद घालण्याऱ्या कार्यकर्त्यांवर काही कारवाई करण्यात येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वेदांतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published: January 20, 2020, 9:42 AM IST

ताज्या बातम्या