जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पुन्हा निर्भया! मित्रांनीच बलात्कार करुन तरुणीला हायवेवर फेकलं

पुन्हा निर्भया! मित्रांनीच बलात्कार करुन तरुणीला हायवेवर फेकलं

पुन्हा निर्भया! मित्रांनीच बलात्कार करुन तरुणीला हायवेवर फेकलं

ग्रेटर नोएडा येथील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर रविवारी पहाटे दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात उपचार घेत असताना पीडितेने जीव सोडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जानेवारी : दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरवून सोडला. 1 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपींना फाशी होणार आहे अशात दिल्लीच्या नोएडामध्ये बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यमुना द्रुतगती महामार्गावरील जेवर भागात शुक्रवारी सायंकाळी मथुरा येथील मित्रांसमवेत जाणारी एक तरुणीसंशयास्पद अवस्थेत जखमी सापडली. तिला ग्रेटर नोएडा येथील कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर रविवारी पहाटे दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात उपचार घेत असताना पीडितेने जीव सोडला. पीडित तरुणीच्या कुटूंबियांनी मित्रांवर सामूहिक बलात्कार आणि खुनाचा आरोप केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून श्याम आणि सचिन नावाच्या युवकावर नोएडा सेक्टर-49 पोलीस ठाण्यात खून आणि सामूहिक बलात्कार आणि एससी-एसटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा सेक्टर -73 मध्ये असलेल्या खेड्यात 20 वर्षीय पीडित तरुणी कुटुंबासह राहत होती. वडील कंपनीची कार चालवतात. आईसुद्धा एका खासगी कंपनीत नोकरी करते. त्याच वेळी पीडित तरुणी सेक्टर-64 मध्ये असलेल्या कंपनीत काम करत होती. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी शुक्रवारी दोन कार्यालयात गेली. संध्याकाळी तिने रात्री उशीरा घरी परत येणार असल्याचे फोनवर सांगितले होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता यमुना एक्स्प्रेस वेवरील जेवर येथील टप्पलजवळ रस्त्यावरील अपघातात मुलगी जखमी झाल्याचा फोन तिच्यासोबत काम करणार्‍या मुलीला आला. त्यांना ग्रेटर नोएडाच्या कैलास रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री 11 वाजता कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले, जिथे त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना दिल्लीतील जीबीटी रुग्णालयात रेफर केले, तेथे रविवारी पहाटे चारच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वडिलांनी श्याम चौखंडी आणि सुरफाबाद येथील सचिनवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर आता मथुरा पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात