शिर्डी, 15 सप्टेंबर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणानं थेट तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार केला. नंतर त्यानं स्वतः वर देखील गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात सदर तरुणी थोडक्यात बचावली असून मात्र तरुणाच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा..प्रेमीयुगुलाचा भयानक अंत! खोट्या प्रतिष्ठेमुळे जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकीचा संसार
मिळालेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावातील विक्रम मुसमाडे (वय-30) याचे एका तरूणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. मात्र, नातेवाईकांच्या विरोधामुळे तरुणीनं विक्रमला लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे विक्रम गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता.
आपल्या प्रेयसीनं लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात घेऊन विक्रम मुसमाडे याने मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास तरुणीचं घर गाठलं आणि तिच्यावर गोळीबार केला. सुदैवाने तरुणीच्या आजीने वेळीच तरुणाला धक्का दिला. त्यामुळे पिस्तूलमधून सुटलेली एक गोळी तरुणीच्या डोक्याला चाटून गेली.
त्यानंतर विक्रमने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. यात तो गंभीर जखमी झाला असून लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली तर फॉरेन्सिक लँबचे पथक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देत पुढील तपासाची चक्रे फिरवली आहे.
विक्रम मुसमाडेकडे पिस्तूल कसे आले, त्याच्याकडे अधिकृत परवाना होता का? अशी अनेक प्रश्न या घटनेमुळे समोर आले आहेत. पोलीस सर्व बाजू तपासत आहे. विक्रम याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र, पोलिस संबंधित तरुणीची चौकशी करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आपल्या मुलीनं प्रेमविवाह केला.. लोक काय म्हणतील.. आता समाजात तोंड काढायला जागा ठेवली नाही.. आपली बदनामी होईल, अशा खोट्या प्रतिष्ठेमुळे जन्मदात्या बापानंच आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. वडिलांनी पतीचा निर्घृण हत्या केल्यानंतर मुलीनं आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलगी पोलिस कॉन्स्टेबल होती. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथी ही घटना घडली आहे.
हेही वाचा...सोलापूर ब्रेकिंग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मुलीच्या डोळ्यांसमोरच 15 दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी पतीची चाकूने भोसकून हत्या केली होती पतीच्या हत्येनंतर दुःखी झालेल्या तरुणीनं देखील आत्महत्या करून आपला जीवनप्रवास संपवला. धक्कादायक म्हणजे महिलेला पाच महिन्यांचा मुलगा आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.