सोलापूर ब्रेकिंग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

सोलापूर ब्रेकिंग: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

दिल्ली हिंसाचारात डाव्या विचारसरणीच्या अनेक नेत्यांना गोवण्यात आलं...

  • Share this:

सोलापूर, 14 सप्टेंबर: सोलापूर शहरात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. दिल्ली हिंसाचारात डाव्या विचारसरणीच्या अनेक नेत्यांना गोवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सरकारनं अनेक आरोपाचा ठपका ठेवला आहे. याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

हेही वाचा...शिर्डीजवळील मंदिरात धाडसी दरोडा, देवांच्या मुकूटांसह दागिन्यांवरच मारला डल्ला

ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितलं की, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, योगेंद्र यादव, अपूर्वानंद, जयंती घोष यांच्यावर केंद्र सरकारने कूटनीतीनं दिल्ली दंगलीत गोवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावरील गन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिस मुर्दाबादच्या घोषणा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी दिल्या.

दरम्यान, दिल्लीत 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान ही दंगल उसळली होती. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर होते. पूर्व दिल्लीत नागरिकत्व कायद्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतलं होतं. या दंगलीमध्ये जवळपास 53 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर या दंगलीच्या चौकशीसाठी एक समिती बसवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीताराम येचुरी यांनी ही केंद्र सरकारची सूडबुद्धी असल्याचा आरोप केला आहे.

दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, स्वराज्य अभियानचे योगेंद्र यादव, प्राध्यापक अपूर्वानंद, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर राहुल रॉय यांचा आरोपपत्रात समावेश आहे. कटात सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेब्रुवारी 2020 मध्ये भारत दौऱ्यावर होते. दिल्लीत ट्रम्प यांचे स्वागत दंगलीने झाले. शाहीनबाग व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात एनआरसीच्या विरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलनच दंगलीला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. 23 फेब्रुवारीला दिल्लीत हिंदू-मुसलमानांमध्ये दंगल भडकली. त्याचे पडसाद सहा दिवस होते.

हेही वाचा...कांदा निर्यात बंदीचा वाद पेटला, ठाकरे सरकारला पाठवणार केंद्राला पत्र

ईशान्य दिल्लीतील सोनिया विहार, गोकुळपुरी, जाफराबाद, कबीरनगर, विजय पार्क, मौजपूर, करावल नगर, सिलमपूर आदी भाग बेचिराख झाला. सर्वत्र इमारती, दुकाने, वाहनांचे सांगाडे होते. रस्त्यांवर दगड-विटांचे ढिगारे होते. जिकडे पाहावे तिकडे रक्ताचा सडा होता. या दंगलीत 53 जणांचा बळी गेला. या दंगलीत 434 लोक जखमी झालेत. 2200 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 783 गुन्हे नोंदविले गेले.

Published by: Sandip Parolekar
First published: September 15, 2020, 1:02 PM IST

ताज्या बातम्या