Home /News /maharashtra /

महाराष्ट्राचं प्रत्युत्तर! चिनी कंपन्यांसोबत 5000 कोटींच्या करारावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्राचं प्रत्युत्तर! चिनी कंपन्यांसोबत 5000 कोटींच्या करारावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

भारत-चीनमधील तणावाच्या काही तासांपूर्वी महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत 5000 कोटी रुपयांचा करार केला होता

    मुंबई, 22 जून : गेल्या आठवड्यात तीन चिनी कंपन्यासोबत झालेल्या 5000 कोटी रुपयांच्या करारावर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 5000 कोटी रुपयांचे करार तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत हा करार करण्यात आला होता. भारत-चीनमधील चकमकीच्या काही तासांपूर्वी महाराष्ट्र सरकारने हा करार केला होता. या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकार या करारावर काय निर्णय घेणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 याअंतर्गत सरकारने तीन चिनी कंपन्यांसह वेगवेगळ्या देशांतील 12 कंपन्यांसमवेत 16,000 कोटी रुपयांचे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (सामंजस्य करार/ MOU) वर हस्ताक्षर केले होते. यामध्ये एका अधिकृत निवेदनानुसार या तिन्ही चिनी कंपन्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्रात 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले होते. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक होण्यापूर्वी सोमवारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0' अंतर्गत हा सामंजस्य करार झाला होता. या निवेदनानुसार तीन चीनच्या कंपन्या- हेंगली इंजिनिअरींग, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन्स जेव्ही विद फोटॉन आणि ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्या पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये गुंतवणूक करतील. या निवेदनात म्हटले आहे की, हेंगली इंजिनिअरींग 250 कोटी आणि पीएमआय ऑटो क्षेत्रात 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर ग्रेट वॉल मोटर्स 3,770 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह एक ऑटोमोबाईल कंपनी स्थापन करणार आहे. >> एक्झॉन मोबिल (यूएस) तेल आणि वायू - इसाम्बे, रायगड - 760 कोटी रुपये >> हेनगली (चीन) अभियांत्रिकी- तळेगाव ( क्रमांक -2), पुणे - 250 कोटी >> सेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण- तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी रुपये >> एपीजी डिसी (सिंगापूर) डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी >> इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन - रांजणगाव, पुणे 120 कोटी >> पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटॉन (चीन) ऑटो-तळेगाव - 1000 कोटी रुपये >> रॅकबँक (सिंगापूर) डेटा सेंटर - ठाणे, हिंजवडी, पुणे 1500 कोटी रुपये >> ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटो मोबाइल तळेगाव – पुणे - 3770 कोटी रुपये सध्या महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत झालेला करार स्थगित केला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्सनाऊने प्रसिद्ध केले आहे. हे वाचा-गलवानमध्ये हिंसक संघर्ष! चीनच्या फसवणुकीनंतर भारतानं तयार केला 'प्लॅन बी' संपादन - मीनल गांगुर्डे
    First published:

    Tags: India china border, Udhav thackarey

    पुढील बातम्या