Home /News /mumbai /

बापरे! मुंबईत पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार, आयुक्तांनी दिला इशारा

बापरे! मुंबईत पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार, आयुक्तांनी दिला इशारा

Mumbai: People stand in queue to visit a doctors clinic to get a medical certificate, during the ongoing COVID-19 nationwide lockdown, at Dharavi in Mumbai, Sunday, May 3, 2020. (PTI Photo)(PTI03-05-2020_000253B)

Mumbai: People stand in queue to visit a doctors clinic to get a medical certificate, during the ongoing COVID-19 nationwide lockdown, at Dharavi in Mumbai, Sunday, May 3, 2020. (PTI Photo)(PTI03-05-2020_000253B)

महापालिकेकडे पुरेसे बेड आहेत. भविष्यात कुणाला बेड्स मिळणार नाही असं होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई 21 जून: महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे (COVID19) रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आता पावसाळा लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यासाठी महापालिकेने (BMC) एक Rapid Action Plan तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी दिली आहे. 7 वॉर्डात रुग्णवाढीचा आकडा जास्त आहे त्यामुळे तिथे आता मिशन झिरो हा Rapid Action Plan  तयार केला आहे. उच्चभ्रू वस्तीतील लोकांना आम्ही जबाबदारीने वागायला सांगितलं आहे. करण हाऊस हेल्पर आणि ड्रायव्हरही पॉझिटिव्ह निघाले आहेत. लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी केलं. महापालिकेकडे पुरेसे बेड आहेत. भविष्यात कुणाला बेड्स मिळणार नाही असं होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. धारावी वरळीनंतर आता मुंबईमध्ये सात वॉर्ड नवीन हॉटस्पॉट म्हणून आयडेंटिफाय करण्यात आलेत आणि या नवीन हॉट सपॉट मध्ये आता रॅपिड Action प्लॅन पूर्णपणे लागू केला जाणार आहे. म्हणजेच मिशन झिरो याअंतर्गत इथे नवीन रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे त्यासाठी 50 फिरते दवाखाने या वॉर्डमध्ये करोना रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यांचे स्वाब टेस्टही केली इथे जाणार आहे. घरीच विलगीकरणात असलेल्या Corona रुग्णांना सरकार देणार Oxymeter हे आहेत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट दहिसर बोरिवली कांदिवली मालाड अंधेरी भांडुप मुलुंड भारताला हानी पोहोचविण्यासाठी चीनचा नवा कट; आता या आवश्यक वस्तू होणार महाग देशात कोरोनाचा (Coronavirus in India) कहर थांबता थांबत नाही आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 387 झाली आहे. तर, 2 लाख 37 हजार 196 रुग्ण निरोगी झाले आहे. मृतांची एकूण संख्या 13 हजार 699 झाली आहे. आनंददायी बातमी म्हणजे सर्वात जास्त लोकं निरोगी झाली आहेत. देशात आतापर्यंत 68 लाखांहून अधिक लोकांची चाचणी झाली असून आतापर्यंत 55.80% लोकं निरोगी झाली आहेत. संपादन - अजय कौटिकवार  
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus update

पुढील बातम्या