मुंबई 08 ऑगस्ट: रणबीर आलियाचा बहुचर्चित सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ (ranbir alia in brahmastra) येत्या सप्टेंबर महिन्यात रिलीज व्हायला सज्ज झाला आहे. अनेक भव्य दिव्य व्हिज्युअलने भरलेल्या या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता सुद्धा दिसून येत आहे. हळूहळू स्नेमाशी निगडित अनेक बाबी समोर येत आहेत. नुकतंच सिनेमातील एक गाणं समोर आलेलं ज्याने चाहत्यांना वेड लावून सोडलं. आता याच सिनेमातील दुसरं गाणं ‘देवा देवा’ सुद्धा रिलीज झालं आहे. देवा देवा हे भक्तीने परिपूर्ण असं गाणं असून यातून भगवान शंकर यांची स्तुती केली आहे. गाण्याच्या ओळी ॐ देवा देवा ॐ देवा देवा नमह या चाहत्यांना आवडल्या असून त्याच्या चालीवर प्रेक्षकही तल्लीन होताना दिसत आहेत. यामध्ये रणबीर कपूरचं पात्र शिवा याला त्याच्या शक्तींची जाणीव होते आणि त्या वेळी सिनेमात हे गाणं दिसून येणार आहे. हे गाणं सगळ्यांनाच भक्तिभावात रंगवून टाकणारं, एका विलक्षण शक्तीची अनुभूती करून देणारं गाणं आहे. तसंच गाण्याची चाल सुद्धा सगळ्यांना लक्षात राहील अशी असल्याने अगदी कमी वेळात गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हे ही वाचा- Anupam Kher: ट्रॅफिक सिग्नलवर फुलं विकणाऱ्या मायलेकीने जिंकलं अनुपम यांचं मन; व्हिडिओ होतोय VIRAL रणबीर आणि आलियाचं पहिलं वहिलं रोमँटिक गाणं केसरिया काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. या गाण्याने अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं आणि त्याला हजारो लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले. तसंच हे गाणं त्यातील काही ओळींमुळे चर्चेचा विषय ठरलं. अनेक लोकांना गाण्यात वापरलेले काही शब्द अनावष्य वाटत होते आणि ते खटकतही होते. त्यामुळे हे गाणं मिम्स आणि जोक्सचा विषय ठरलं. त्यानंतर आलेलं हे गाणं सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं जात आहे. पण या गाण्याने चाहत्यांचं मन जिंकलं की हे गाणं सुद्धा मिम्स आणि चर्चेचा विषय ठरेल हे येत्या काळात पाहावं लागेल.
रणबीर आणि आलिया यांचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा अनेक बिगबजेट सिनेमानं मागे टाकणारा असणार हे समोर येणाऱ्या अनेक अपडेट्सवरून समजू शकेल. या सिनेमाचा एकूण लुक, दिव्य शक्तींभोवती फिरणारं कथानक, व्हिज्युअल्स याने सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता सुद्धा बघायला मिळत आहे. रणबीर आलिया वारंवार सिनेमासाठी घेतलेल्या कष्टांबद्दल बोलताना सुद्धा दिसत आहेत.